पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर व जिल्ह कार्यकारिणीची बैठक पार पडली. या वेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप, राष्ट्रीय चिटणीस पिसाळ व महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख अनिल ताडगे, संस्थापक सदस्य जगजीवन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व पदाधिकारी यांच्या एकमताने मयुर सोमनाथ गुजर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. मयुर गुजर यांना अध्यक्ष दिलीप जगताप यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे मा. अध्यक्ष वैभव शिळीमकर, कार्याध्यक्ष मंगेश साखरे, संपर्क प्रमुख राजेश केदारी व राजेंद्र पासलकर, उपाध्यक्ष सुभाषराव ढमाले, उपाध्यक्ष अभिजीत ताठे, पुणे शहर महिला अध्यक्षा आरतीताई मारणे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा ज्योतिताई कोंडे, जिल्हाध्यक्ष पुणे प्रशांत वांढेकर, पूर्व जिल्हाध्यक्ष पुणे तुषार शेळके, जिल्हा सरचिटणीस दुष्यंतराजे जगताप व महासंघाचे अनेक सभासद, कार्यकर्ते उपस्थित होते.