शिरुर : पुणे जिल्हा क्रीडा परीषद अंतर्गत शिरूर तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत टाकळी हाजी ( ता. शिरुर ) येथील मा.बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 17 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
गावडे विद्यालयाची जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत निवड झाली आहे. रविवार (दि.1) सप्टेंबर आयोजित केलेल्या अंतिम स्पर्धेत अंतिम सामन्यात 43-42 गुणांच्या झालेल्या अटीतटीच्या लढतीत गावडे विद्यालय एक गुणाने विजयी झाले असून प्रथम क्रमांक मिळविला आहे. यामध्ये देविदास शिंदे (कर्णधार), सिद्धांत सोदक (उपकर्णधार), साईराज भाईक, सार्थक साबळे, सार्थक घुले, सूरज साठे, आदर्श शिर्के, भारत गाढवे तर प्रशिक्षक म्हणून शुभम गावडे यांनी कामगिरी केली आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य आर.बी.गावडे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार पोपटराव गावडे, सचिव राजेंद्र गावडे, सहसचिव सुनिता गावडे, व्यवस्थापकीय संचालक अजित गावडे, विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी तालुक्यातील विविध विद्यालयातील शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धोंडीभाऊ जाधव, युवा उद्योजक संदीप सोदक, कोहिनूर उद्योग समूहाचे चेअरमन स्वप्निल गावडे, उद्योजक विनोद खोमणे, महिंद्रा कंपनीचे मॅनेजर अरुण सोदक, आय.सी.आय.सी.आय बँकेचे मॅनेजर विजय थोरात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक दौलत सोनवणे तर आभार पगारदार नोकरांची पतसंस्था चेअरमन संभाजी गावडे यांनी मानले.