हनुमंत चिकणे
लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर परीसरातील देवयानी शिवाजी ननवरे (वय-१०) व स्वानंदी सचिन तुपे (वय- ११) या शालेय विद्यार्थिनींनी आपल्या पालकांसह हिमालयातील माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला आहे. देवयानी व स्वानंदी या दोघींनी हा ट्रेक पूर्ण केल्याने पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात कौतुक होत आहे.
देवयानी ननवरेचे वडील, शिवाजी ननवरे हे जिल्हा (ग्रामिन) पोलिस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करतात. तर देवयानी ही कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एंजल हायस्कुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आहे. तर स्वानंदी तुपेचे वडील सचिन तुपे कुंजीरवाडी (थेऊरफाटा) येथील उद्योजक आहेत. स्वानंदी हिच्याबरोबर वडील, सचिन तुपे, आई प्रिया तुपे व कुंजीरवाडी येथील गिर्यारोहक पंडित झेंडे यांनी माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतचा जगातील सर्वात उंच, कठीणात कठीण एवरेस्ट शिखरावरील चढाईचा बेस कँप सर केला आहे.
दरम्यान हिमालयातील माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठताना आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी जी आव्हाने तिच्यासमोर होती ती म्हणजे, सरळ चढ असलेली शिखरं सर करणे, शून्य अंश तापमानाशी झुंज, थंडगार वारा, गोठलेले पाणी, ऑक्सिजनची घसरत जाणारी पातळी, कुठेही शेवट न दिसणारी अशी अंतहीन चढाई आणि आव्हानात्मक हवामानातील बदलांना तोंड द्यावे लागले.
१३ दिवसांचा हा ट्रेक असल्याने अशावेळी भल्याभल्यांना घाम फुटतो. पण देवयानी व स्वानंदी य दोघी जिद्दीने शिखर चढतच होत्या. काहीही झालं तरी ते उंच टोक गाठायचं म्हणजे गाठायचचं, अशी जिद्द उराशी बाळगून सचिन तुपे व शिवाजी ननवरे यांच्यासोबत दोघीनीही एवरेस्ट शिखरावरील चढाईचा बेस कँप ची उंची गाठण्यात तिने यश संपादन केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य करत असताना शिवाजी ननवरे यांना गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. ती त्यांनी पुणे ग्रामीण येथे कर्तव्य करत व्यस्त वेळापत्रकातून कायम ठेवली. एवरेस्ट बेस कॅ्प सर करण्यासाठी शारीरिक क्षमतेबरोबर मानसिक क्षमता अत्यावश्यक असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. देवयानी व स्वानंदी या दोघींनाही डान्स, स्विमिंग, ट्रेकिंग क्षेत्रात आवड असल्यामुळेंच एव्हरेस्ट बेस कॅम्प हा कँप हा टप्पा त्यांनी पूर्ण केला.
एवरेस्ट बेस कॅम्प करताना येणाऱ्या अडचणी व आव्हानांवर मात कशी करता येते, प्रतिकूल वातावरणात कोणत्या उपाय योजना कराव्या लागतात या विषयी माहिती दिली. तो पूर्ण करण्यासाठी सात दिवस लागले तापमान उणे असलेल्या चढाईत प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागतो तसेच योग्य ती काळजी घ्यावी लागते, अति उत्साह जीवावर बेतू शकतो या प्रतिकूल तापमानात स्वतःच्या संरक्षणासाठी उच्च ब्रँडेड दर्जाचे कपडे अति महत्त्वाचे ठरतात.
उंच ठिकाणामुळे हवेतील तसेच शरीरातील ऑक्सिजन कमी होतो. त्यामुळे नॉर्मल चालताना देखील दमछाक होते. शारीरिक मानसिक स्वास्थ्य असणारे व आत्मविश्वास असणारे ट्रेकर्सच यशस्वी होतात. बेस कॅम्प पूर्ण करण्यासाठी रोज व्यायाम करणे सायकलिंग, स्विमिंग, रनिंग जवळपासचे परिसरातील मोठे डोंगर चढणे यावर भर दिला पाहिजे त्याच्यामुळे आत्मविश्वास निर्माण होतो असे तुपे व ननवरे यांनी सांगितले.
याबाबत देवयानी ननवरे म्हणाली, “महाराष्ट्रात गड किल्ल्यांची ट्रेकिंग हि सुरूच असते मात्र नवीन काहीतरी नवीन शिकायला मिळाले. उणे तापमान असताना चालण्यासाठी जड जात होते. लक्ष पूर्ण झाल्याने खूप आनंद झाला. भविष्यात जर वेळ मिळाली तर हिमालयातील आणखी ट्रेक करण्यासाठी तत्पर आहे.”
याबाबत स्वानंदी तुपे म्हणाली, “एवरेस्टला गेल्याचा खूप आनंदही झाला. त्यात थोडासा त्रास झाला परंतु आमचे लक्ष पूर्ण झाल्याने खूप आनंदही झाला. शेवटच्या दोन दिवसात ऑक्सिजन लेवल हि कमी असते यामध्ये चालायला खुप दम भरत होता. परंतु डॉक्टर, टेकर्स यांच्याकडून माहिती घेऊन हा ट्रेक सुरूच ठेवला.”
सचिन तुपे व शिवाजी ननवरे म्हणाले, वास्तविक हा ट्रेक १४८ किमीचा आहे आणि लुक्ला (समुद्रसपाटीपासून २ हजार ८४३ मीटर उंच) ते फाकडिंग (२ हजार ६१० मीटर उंच) ते नामचे बाजार (३ हजार ४४० मीटर) ते टेंगबोचे (३ हजार ८६० मीटर) ते डिंगबोचे (४ हजार ४१० मीटर) ते लोबुचे (४ हजार ९१० मीटर) ते गोरक्षेप (१४० मीटर) ते काला पथर (५ हजार ५५० मीटर) आणि अखेरीस मानाचा रुरा म्हणजेच एव्हरेस्ट बेस कॅम्प (५ हजार ३६४ मीटर) असा हा भव्यदिव्य आणि खडतर ट्रेक कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने सहजशक्य झाल्याची भावना व्यक्त केली. तसेच हा ट्रेक या रणरागिणींनी पुर्ण केला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठताना आणि ते ध्येय साध्य करताना भल्याभल्यांना घाम फुटतो. मात्र प्रिया, स्वानंदी आणि देवयानी यांच्याकडे ती जिद्द होती. काहीही झाले तरी ते उंच टोक गाठायचे म्हणजे गाठायचेच असा निर्धार त्यांनी मनाशी बाळगला होता. ही जिद्द उराशी बाळगून माझ्यासह त्यांनी ती उंची गाठली आणि यशस्वीरित्या पुर्ण केला.
दरम्यान, श्रीनाथ पतसंस्थेचे संचालक सचिन तुपे, शिवाजी ननवरे, पंडित झेंडे, प्रिया तुपे, स्वानंदी सचिन तुपे, व देवयानी शिवाजी ननवरे यांनी माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प (५३६४ मीटर) शिखर जिद्दने व निर्धाराने यशस्वीरित्या पूर्ण केल्याबाबत त्या सर्वाचा सत्कार संस्थेच्या वतीने संस्थेच्या कार्यालयात करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप धुमाळ, कुंजीरवाडीच्या माजी सरपंच सुनीता धुमाळ, महादेव धुमाळ, दीपक खटाटे, उमेश रागपसरे, संभाजी आंबेकर, व्यवस्थापक शिवाजी जावळे, दत्तात्रय कुंजीर, राहुल धुमाळ, अजय कुंजीर, गोकुळ ताम्हाणे, डॉक्टर मराठे, संदीप कुंजीर, आदी मान्यवर उपस्थित होते.