डोंबिवली : बलात्काराच्या एका पाठो-पाठ एक घटना घडत आहेत. अशातच आत्ता डोंबिवली येथील टिटवाळ्याजवळच्या एका गावात बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. अंगणात खेळत असलेल्या दोन वर्षीय चिमुकलीला फरफटत निर्जनस्थळी घेऊन जात ३५ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना टिटवाळ्याजवळच्या एका गावात घडली आहे.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी तपासाला वेग देऊन तपास चक्र फिरवून आरोपीला अवघ्या काही तासांतच गजाआड केले आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सोमनाथ ठाकरे असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, लैगिक बलात्कार करून चिमुकलीला तेथेच सोडून नराधमाने पळ काढला. चिमुकली रडत रडत घरी आली. त्यावेळी तिला वेदना असह्य होऊ लागल्या होत्या. मुलीची अवस्था खूप वाईट झाली होती. तिला पाहून आई-वडिलांना संशय आला. त्यांनी मुलीची विचारपूस केली असता तिने आपल्यासोबत घडलेल्या अघटीत घटनेमुळे प्रचंड घाबरलेली चिमुकली काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती.
दरम्यान, अखेर तिने बेतलेला प्रसंग आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना सांगितला. हे ऐकून आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. वेळ न घालवता मुलीसह आई-वडिलांनी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.