मुंबई : मालाडमधील आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळल्याची घटना ताजी असतानाच आता कोल्ड कॉफीमध्ये झुरळ आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने ग्राहकांना मोठा धक्काच बसला आहे. शुक्रवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब ग्राहकाने हॉटेल मालकाच्या निदर्शनास आणून दिली. पण त्याने आणि कर्मचाऱ्यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. ग्राहकाने थेट पोलीस ठाणे गाठत याप्रकाराविषयी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत हॉटेल मालक, व्यवस्थापक आणि कामगारावर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी सविस्तर माहिती जाणून घेऊयात, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवणाऱ्या प्रतीक रावत या 25 वर्षाच्या तरुणाने कोल्ड कॉफी ऑर्डर केली होती. त्यावेळी त्यांची कॉफी कडवट वाटल्यामुळे त्यांनी ती कॉफी थोडी गोड करून आणण्यास सांगितले. गणेश केकान मित्राने ही कॉफी अर्ध्याच्यावर संपवली. त्यावेळी रावत यांना ग्लासात काही दिसले. त्यानी बारकाईने पाहिले असता ते कॉफित झुरळ असल्याचे आढळले.
दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर या दोघांनी वेटरला बोलावून घेतले. त्याला या प्रकाराबद्दल जाब विचारला. त्यावेळी त्याने कानावर हात ठेवला. या दोघांनी नंतर व्यवस्थापकाच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्याने पण त्यांना योग्य उत्तर दिले नाही. दोघांनी पण समाधानकारक उत्तर दिले नाही. चूक झाल्याची कबुली दिली नाही. त्यानाराजीने प्रतिक रावत आणि त्याचा मित्राने थेट मालाड पोलीस ठाणे गाठले.
Health Alert: A customer at Open Shine Sheesha & Restaurant, Solitaire Building, Malad, opposite Infinity 2, allegedly discovered a dead cockroach in his cold coffee after consuming 70% of the beverage. Serious concerns raised over hygiene. Authorities urged to take swift action. pic.twitter.com/6gMmxYvTlP
— mumbaiuncensored 🇮🇳 (@uncensoredlive) August 30, 2024
याप्रकरणी मालाड पोलीसात तक्रार देण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकारानंतर मालाड पोलीस अॅक्शन मोडवर गेले. त्यांनी हॉटेल मॅनेजर, वेटर आणि अन्य संबंधितांवर कलम 125, 274, 275 आणि 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती देण्यात आली आहे.