पुणे : पुणे शहरात अत्याचाराचे प्रमाण वाढतच चालले आहे. मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच आता विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाने शाळकरी मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हि घटना २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांना वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
नागनाथ गायकवाड (वय-४९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागनाथ हा विद्यार्थी वाहतूक करतो. पीडित मुलीच्या घराजवळ तो त्याची गाडी लावतो. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ती मुलगी त्यांच्या घरासमोर खेळत होती. त्यावेळी नागनाथने खाऊचे आमिष दाखवून तो मुलीला घरासमोर लावलेल्या बसमध्ये घेऊन गेला. त्याने त्या मुलीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, बसजवळ कोणीतरी आल्याची चाहूल लागल्याने गायकवाडने मुलीला तिथेच सोडून देत पसार झाला. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती नात्यातील महिलेला दिली. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी गायकवाडला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.