विजय लोखंडे
वाघोली : आमदार अशोक पवार यांची निष्ठा, कार्यतत्परता व जनसेवेशी जोडलेली नाळ, रचनात्मक विकासाचा उंचावणारा आलेख, कुटुंबासारखी काळजी घेणारे आमदार दाम्पत्य. त्यामुळे यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत आमदार पवार विजयाचा गुलाल उधळणार आहेत. त्यांना यावेळी मंत्रिपद मिळावे ही अपेक्षा व्यक्त करताना अशोक पवार यांच्यावर महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी शुभेच्छा पर अभिनंदनाचा वर्षाव केला.
यावेळी आमदार अशोक पवार यांच्या वडगाव रासाई येथील शेलारवाडीतील निवासस्थानी ३० ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ पासून ते ३१ ओगस्टच्या मध्यरात्री १२ पर्यंत शिरूर-हवेली तालुक्यातील जनतेने शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यामध्ये गर्दीचा उच्चांक पहायला मिळाला.
वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ व फुलांचा हार, मंत्रालयाची प्रतिकृती, लालदिवा, अँबेसिडर पांढरी गाडी व आमदार पवार यांचा प्रतिकृती असलेला केक कापला.
आमदार अशोक पवार यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहत आपला प्रामाणिकपणा दाखवत निष्ठा जपली. त्यामुळे शिरूर-हवेलीतील जनतेने महाराष्ट्राचे भावीमंत्री म्हणून आमदार अशोक पवार यांना शुभेच्छा देत त्यांचा वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद सन्मान करण्यात आला.
– पंडित दरेकर, माजी सदस्य -जिल्हा नियोजन समिती
आमदार अशोक पवार यांची निष्ठा, प्रामाणिकपणा व जनतेच्या हितासाठी व्यापक काम केले. विकास कामांचा चढता आलेख व सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी यामुळे आमदार पवार यांना आगामी काळात मंत्रिपद मिळण्यासाठी आम्ही शुभेच्छा देत आहोत.
– राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच-वाघोली तथा अध्यक्ष-वाघेश्र्वर देवस्थान ट्रस्ट
आमदार अशोक पवार यांनी कोरोना काळात केलेले काम, महापुराच्या काळात जपलेली माणुसकी व सामाजिक बांधिलकी, दर्जेदार विकासकामे यामुळे सर्वसामान्य जनता अशोक पवार यांच्या रचनात्मक विकास कामामुळे आनंदी असून आगामी काळात त्यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडावी ही आम्हाला आशा आहे.
– शिवदास उबाळे, पुणे जिल्हाध्यक्ष – राष्ट्रवादी ओबीसी सेल (शरद पवार) तथा माजी सरपंच-वाघोली