भिगवण : बदलापूर येथे घडलेल्या अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच भिगवण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मदनवाडी येथे अल्पवयीन मुलीचे कपडे फाडून मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असा प्रकार घडला आहे. त्यामुळे भिगवण व भिगवण परिसरात महिला सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सदर घटनेत मुलीच्या फिर्यादी चुलत भावालाही जबरदस्त मारहाण करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर तुला जिवंत मारून टाकू अशी धमकी आरोपींनी दिली आहे. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी रोहन बाळासो गायकवाड, अमित पदमसिंह देवकाते, अतुल अंकुश देवकाते, धिरज (अविनाश) अंकूश देवकाते, लहू अर्जुन देवकाते, गणेश संजय गायकवाड, हर्षद हनूमंत धुमाळ, प्रणव गणेश कुंभार, गणेश संजय गायकवाड व अनिकेत राजेंद्र कुंभार (सर्व रा मदनवाडी ता इंदापूर जि पुणे) या दहा आरोपींवर गुन्हा दाखल केला असून यातील रोहन गायकवाड या आरोपीला अटक करण्यात आली आहे. बाकीचे नऊ जण फरार आहे.सदरील घटना बुधवारी(दि.२१)रोजी घडली आहे. वरील सर्व १० आरोपींवर पोस्को व इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी दुपारी घरी एकटी असताना तिने प्रेमाला नकार दिला म्हणून आरोपी नामे रोहन बाळासो गायकवाड व अमित पदमसिंह देवकाते हे दोघे फिर्यादीची चुलत बहिन हिचे कपडे फाढून तिला म्हणाले कि, आम्हाला तू खूप आवडते असे म्हणुन तिचे मनास लज्जा उत्पन होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच वरील सर्व आरोपींनी बेकायदा जमाव जमवून अतुल अंकुश देवकाते याने फिर्यादीस धरून, धिरज (अविनाश) अंकूश देवकाते याने लोखंडी रॉड व विटेने फिर्यादीचे डोक्याच्या मागच्या बाजूस मारून मोठी दुखापत केली.
फिर्यादीस खाली पाडून आरोपींनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ दमदाटी केली तसेच अतुल देवकाते याने फिर्यादीस तु जर माझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार केली तर तुझ्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून गोळ्या घालून मारीन. अशी धमकी दिली. सदरील घटनेचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील करीत आहेत.