मुंबई : राज्यात अपघाताचे सत्र सुरुच असतानाच मुंबईत पुन्हा हिट एंड रनची केस घडली आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरात भरधाव येणा-या एसयुव्ही कारने दुचाकीस्वाराला धडक दिली आहे. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला रुग्णालयात नेले असता, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
In Mumbai’s Goregaon area, a speeding car hit a 24-year-old bike rider and fled from the spot. As soon as the information of the incident was received, police reached the spot and took the injured to the hospital where the doctor declared him dead. The car has been seized, two…
— ANI (@ANI) August 29, 2024
या अपघातानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीसह तीन आरोपींना अटक केली आहे. अद्याप चालक कोण आहे याबाबत माहिती उपलब्ध झाली नाही आहे. पोलीसांकडून घटनेचा अधिक तपास सुरु आहे. आरोपींना ताब्यात घेत त्यांची कारही जप्त करत आता पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.