भोर : पश्चिमेकडील वेळवंड खोऱ्यातील (ता. भोर) येथील तीन म्हैशींचा विजेच्या धक्क्याचा मृत्यू झाला. शेतकरी तानाजी तुकाराम पांगुळ हे त्यांच्या खासगी रानात दुपारी जनावरे चारण्यासाठी बुधवार २८ ऑगस्टला गेले होते. अतिवृष्टीने आणि जोराच्या वाऱ्यामुळे विद्युतवाहक तारा तुटून पडल्या होत्या. जनावरे चरत जात असताना या विद्युत वाहकतारांचा जोरदार धक्का बसल्याने तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
दरम्यान, म्हशींना वाचवण्यासाठी शेतकरी तानाजी पांगुळ यांनी ग्रामस्थ दत्ता मोरे, जगदीश बैलकर, रामभाऊ दिघे, रवींद्र पांगुळ यांच्यासह स्थानिकांनी घटनास्थळी जाऊन म्हशींना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. शेतकऱ्याचे दीड लाखांहून अधिक रकमेचे शेतकऱ्याचे नुकसान झाले. दुर्घटनाग्रस्त शेतकऱ्याला तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.