सागर जगदाळे
भिगवण : इंदापूर तालुक्यातील भिगवण हे गाव दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जाते. भिगवण व भिगवण परिसरातील सर्विस रोड तसेच अंतर्गत रस्ते प्रकाशमय करण्यासाठी भिगवण ग्रामपंचायतीला रोटरी क्लब ऑफ भिगवणच्या वतीने तसेच डिस्ट्रिक्ट ३१३१, सुझुकी वायर अँड केबल यांच्या मदतीने भिगवण व परिसरात बसवण्यासाठी २०० स्ट्रीट लाईट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ.अनिल परमार यांच्या हस्ते सरपंच तानाजी वायसे यांच्याकडे देण्यात आल्या…
कार्यक्रमासाठी रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. अनिल परमार, फर्स्ट लेडी हेमा परमार, रो. मारुतराव जाधव, रो अनंत तिकोने, वसंतराव माळुंजकर, गांधी नरेंद्र, भिगवण रोटरी क्लबचे अध्यक्ष अध्यक्ष डॉ.अमोल खानावरे, माजी अध्यक्ष संजय खाडे, सचिन बोगावत, रियाज शेख, संपत बंडगर, उपाध्यक्ष किरण रायसोनी, सचिव वैशाली बोगावत, खजिनदार संतोष सवाणे, तुषार क्षिरसागर, रणजीत भोंगळे, संजय रायसोनी, दीपा भोंगळे, निलिमा बोगावत तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक शिंदे, माजी उपसभापती संजय देहाडे, तसेच सर्व सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.
स्ट्रीट लाईट वाटप कार्यक्रम प्रसंगी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. अनिल परमार म्हणाले की ग्रामीण भागामध्ये अनेक सोयी सुविधांचा अभाव असतो. ते पूर्ण करण्यासाठी रोटरी क्लब नेहमी पुढाकार घेत असतो. भिगवण ग्रामपंचायत कडून स्ट्रीट लाईटची मागणी आल्यामुळे रोटरी क्लबकडून त्या देण्यात आल्या आहेत. येणाऱ्या काळात देखील काही मदत लागल्यास आम्ही त्यासाठी सदैव तत्पर राहो असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी बोलताना माजी अध्यक्ष संजय खाडे म्हणाले की, भिगवण मधील व्यापार पेठ ही मोठी असून येथील व्यापारी रात्री उशिरापर्यंत आपले दुकान चालू ठेवून व्यवसाय करत असतात तसेच काही ठिकाणी लाईट नसल्यामुळे रात्री चोऱ्यांचे प्रमाणात वाढ होत आहे असे दिसून आले, यामुळे नक्कीच याच्यावर नियंत्रण राहण्यास मदत होईल.
यावेळी बोलताना रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ अमोल खानावरे म्हणाले की पहाटेच्या वेळी व्यायामासाठी गावातील नागरिक खूप प्रमाणावर सर्विस रोडने फिरायला जात असतात त्यांच्या दृष्टीने ही लाईट उपयोगात येणार आहेत, तसेच गावातील अंतर्गत रोड वरही या सर्व लाईट बसवण्यात येणार आहेत. यापुढील काळातही ग्रामपंचायत बरोबर गावामध्ये रोटरीतर्फे नवीन उपक्रम राबवणार आहोत.
यावेळी रोटरीचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रतिनिधी जावेद शेख, पराग जाधव, अमितकुमार वाघ, गुरप्पा पवार यांनी केले तर आभार सरपंच तानाजी वायसे यांनी मानले.