वाशिम : राज्यात नेमकं चाललंय काय? एका मागून एक लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. राज्यात महिला वर्ग स्वतःला असुरक्षित समजू लागला आहे. बदलापूर प्रकरण ताज असताना आता अशातच वाशीममधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरालगत असलेल्या वस्तीतील एका 14 वर्षीय मुलीवर अपहरण करून तीन नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. राज्यात नेमकं चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे.
आधी अपहरण, नंतर लैंगिक अत्याचार..
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या रिसोड शहरा जवळ असणाऱ्या वस्तीतील एका 14 वर्षीय बालिकेवर अपहरण करून तीन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. दरम्यान ही घटना 21 ऑगस्टच्या रात्रीच्या सुमारास घडली आहे. परिणामी, पिडीत बालिकेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून रिसोड पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पीडितेच्या जबानीवरून पोलिसांनी तीन नराधम आरोपीना अटक केली आहे. पोलिसांनी या घटनेत अधिक चौकशी केली असता, पिडीत बालिकेचे या पैकी एका आरोपीशी मैत्रीचे संबध होते, अशी माहिती समोर येत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिली आहे.