मुंबई : शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढउतार होत आहे. असे असताना देशांतर्गत शेअर बाजार सलग पाचव्या दिवशी तेजीसह बंद झाला. आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी प्रमुख बेंचमार्क निर्देशांक मजबूत वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 611.90 (0.75%) अंकांनी वाढून 81,698.11 वर बंद झाला. तर निफ्टी 187.45 (0.76%) अंकांच्या वाढीसह 25,010.60 वर बंद झाला.
अमेरिकेची बँक असलेल्या यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर प्रमुख बेंचमार्क निर्देशांकांमध्ये वाढ दिसून आली. सकारात्मक यूएस चलनवाढ आणि बेरोजगारी डेटा, कमी व्याज दरांमुळे जागतिक बाजारपेठेत खरेदीला चालना मिळाली आहे. त्यात ओएनजीसी आणि एनटीपीसीच्या समभागांनी प्रत्येकी दोन टक्क्यांनी वाढ नोंदवली.
परकीय भांडवलाची आवक आणि एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या प्रमुख समभागांमध्ये खरेदीमुळेही बाजाराला चालना मिळाल्याचे अर्थविषयक जाणकरांनी सांगितले. त्यानुसार, सेन्सेक्स 611.90 अंकांनी वाढून 81,698.11 वर बंद झाला. तर निफ्टी 187.45 अंकांच्या वाढीसह 25,010.60 वर बंद झाला.