संतोष पवार
पळसदेव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि एस बी स्पोर्ट्स ॲकॅडमी पळसदेव यांच्या संयुक्त विद्यमाने पळसदेव येथे इंदापूर तालुका शालेय कबड्डी स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. पळसदेव येथील एस बी स्पोर्ट्स ॲकडमीच्या मैदानावर १७ व १९ वर्षीय वयोगटातील मुले/मुलींच्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन २० ते २२ ऑगस्ट या कालावधीत करण्यात आले होते. या स्पर्धेत १७ वर्षाखालील वयोगटातील संघात ५० संघानी तर १९ वर्षाखालील वयोगटातील २० संघानी सहभाग घेतला.
तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचा निकाल
१७ वर्ष मुली : प्रथम क्रमांक -वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज कळंब, द्वितीय क्रमांक – छत्रपती मुलींचे हायस्कूल भवानीनगर, तृतीय क्रमांक -श्री नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर.
१७ वर्ष मुले : प्रथम क्रमांक – वालचंद विद्यालय व ज्युनिअर कॉलेज कळंब, द्वितीय क्रमांक -छत्रपती मुलांचे हायस्कूल भवानीनगर, तृतीय क्रमांक – जिजामाता माध्यमिक विद्यालय सराटी.
१९ वर्ष मुली : प्रथम क्रमांक -एनईएस हायस्कूल निमसाखर, द्वितीय क्रमांक -श्री पळसनाथ विद्यालय पळसदेव, तृतीय क्रमांक -एल जी बनसुडे विद्यालय पळसदेव.
१९ वर्ष मुले : प्रथम क्रमांक -वालचंद विद्यालय व ज्युनिअर कॉलेज कळंब, द्वितीय क्रमांक – विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल भिगवण, तृतीय क्रमांक – एल जी बनसुडे विद्यालय पळसदेव.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेते संघाची जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजेत्या संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीणभैय्या माने , इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, दत्तात्रेय व्यवहारे आदींसह तालुक्यातील क्रीडाशिक्षक, पंच, खेळाडू उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिरोज तांबोळी यांनी केले. एस बी स्पोर्ट्स ॲकॅडमीचे अध्यक्ष सागर बनसुडे यांनी आभार मानले.