पुणे : पुणेकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आणखी एका सेवेची भर पडली आहे. आजपासून येरवडा स्थानक सुरु करण्यात आले आहे. वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील येरवडा मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत प्रवासी सेवा सुरु असणार आहे.
येरवडा मेट्रो स्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात आल्याने वनाज ते रामवाडीपर्यंतची मेट्रोलाईन पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. यामुळे येरवडा भाग उर्वरित मेट्रो नेटवर्कशी आणि पुणे शहराशी जोडला जाईल. यामुळे विद्यार्थी, व्यावसायिक, कर्मचारी वर्ग, येरवडा स्थानकाजवळ असणाऱ्या आयटी हबमधील कर्मचारी आणि रहिवाशांचा फायदा होणार आहे.
“पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना कार्यक्षम आणि सोईस्कर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून येरवडा मेट्रो स्टेशन सुरू होत आहे,’’ असे यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी नमूद केले.
#पुणेमेट्रो उद्या, दिनांक २१ ऑगस्ट २०२४ पासून #येरवडा मेट्रो स्थानक प्रवासी सेवेसाठी सुरु करीत असून सकाळी ६:०० ते रात्री १०:०० वाजतादरम्यान ही सेवा नियमित सुरु असेल. प्रवासी ह्या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
Pune Metro is set to open Yerwada Metro Station for commercial operation on… pic.twitter.com/Q8S9cmD4w1
— Pune Metro Rail (@metrorailpune) August 20, 2024
येरवडा मेट्रो स्थानकाची बाह्यरचना वैशिष्टपूर्ण आहे. स्थानकाचा दर्शनी भाग ऐतिहासिक दांडी मार्चपासून प्रेरित आहे, जो भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वपूर्ण अध्यायाचे प्रतीक आहे.