पुणे : सध्या पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाची चर्चा देशभर सुरू आहे. पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपींच्या जामीन अर्जावर न्यायालय आज मंगळवारी (दि.20 ऑगस्ट) निकाल देणार आहे.
पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्वयीन मोटार चालक मुलाचे वडील विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल , आई शिवानी अग्रवाल, ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर तसेच अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना अटक करण्यात आली होती. त्यांनी आपापल्या जामीन अर्जासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
या प्रकरणी अगरवाल दाम्पत्यासह यांच्यासह ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, अशपाक मकानदार व अमर गायकवाड यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या आरोपींचा मुक्काम सध्या येरवडा कारागृहात असून, विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर सरकार व बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यावर आदेशासाठी आज 20 ऑगस्ट ही तारीख देण्यात आली आहे.
आरोपीने केलेल्या युक्तीवादानंतर सरकार पक्षाने त्यांच्यावर केलेल्या आरोपांची सिद्घता करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, आजच्या निर्णयावर संपूर्ण शहराचे लक्ष लागलेले आहे.