लोणी काळभोर : शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचा (शरद पवार गट) खासदार निवडून आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारे शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांना मोठा धक्का बसला आहे. मागील २० वर्षापासून आमदार अशोक पवार यांना कट्टर पाठींबा देणाऱ्या लोणी काळभोर (ता. हवेली) येथील राजकीय पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्यने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे अशोक पवार यांच्या गटाला लोणी काळभोरमध्ये खिंडार पडले आहे. अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सणववाडी (ता. हवेली) येथे जण सन्मान यात्रेचे सोमवारी (ता.१९) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत युवराज काळभोर, सिद्धेश्वर काळभोर, रमेश प्रभाकर काळभोर, किरण वाळके, स्वप्निल काळभोर, विलास वीरकर, सचिन वाघुले, सतीश काळभोर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अजित पवार गटात भव्य प्रवेश केला. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार अशोक पवार गटाला खिंडार..
आमदार अशोक पवार हे गेले अनेक दिवसांपासून कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नव्हते. असा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळे अशोक पवार यांची भूमिका डावलून लोणी काळभोर येथील पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुका पाहता शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. तर कार्यकर्त्यांच्या या प्रवेशामुळे आमदार अशोक पवार गटाला लोणी काळभोर मध्ये खिंडार पडले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनिर्वाचित पदाधिकारी पुढीलप्रमाणे..
युवराज काळभोर (युवक कार्याध्यक्ष), सिद्धेश्वर काळभोर (युवक जिल्हा उपाध्यक्ष), रमेश प्रभाकर काळभोर (जिल्हा उपाध्यक्ष -किसान सेल), सचिन वाघुले (ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष),जनार्दन जोगदंड (जिल्हा उपाध्यक्ष-सामाजिक न्याय ), सतीश काळभोर (वरिष्ठ उपाध्यक्ष हवेली तालुका), किरण वाळके (हवेली तालुकाअध्यक्ष – क्रीडा सेल), स्वप्निल काळभोर (औद्योगिक तालुकाध्यक्ष), विलास वीरकर ( तालुका उपाध्यक्ष), गौरव शेलार (सामाजिक न्याय उपाध्यक्ष ), दिनेश आवारे (सामाजिक न्याय तालुका सरचिटणीस), सतीश बाळशंकर(सामाजिक न्याय तालुका चिटणीस), बाबासाहेब भिसे(हवेली उपाध्यक्ष -सामाजिक न्याय ), सचिन काळभोर (युवक उपाध्यक्ष).