पुणे : पुणे पोलीस दलातील महिला सहायक पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. एक लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्या कोंढवा पोलीस ठाण्यात कार्य़रत होत्या. याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आदेश काढला आहे.
हर्षदा बाळासाहेब दगडे असे निलंबित करण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, कोंढवा पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोषारोप पत्रामध्ये मदत करुन आरोपीचे आई-वडील व बहीण यांना अटक न करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती.
दरम्यान, लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली, आणि त्यात दगडे यांनी लाचमागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर दगडे यांच्या विरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यामुळे दगडे यांनी केलेले वर्तन हे बेजबाबदार, बेफिकीर, नैतिक अधःपतनाचे असल्याचे त्यांना पोलिस आयुक्त गुप्तांनी खात्यातून निलंबीत के