पुणे : पुण्यात आज पासून सीएनजी गँसच्या किमतीमध्ये एका रुपयांची वाढ करण्यात आल्याने येथील नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या दरवाढीमुळे पुण्यात सीएनजीचा दार ९२ रुपये प्रति किलो या दराने उपलब्ध होणार आहे. एमएनजीएलने हे दर लागू केले आहेत.
मागील दोन काहीन्यात सीएनजीच्या दरात तब्बल ४ रुपयांची वाढ झाली असून आता पुन्हा एका रुपायाने वाढ झाल्याने सीएनजीने थेट डिझेलचा दर गाठला आहे.
डिझेल आणि सीएनजी गॅसच्या दरात केवळ ३६ पैशांचा फरक राहिला असल्याने सामान्य वाहनचालक, रिक्षाचालक परेशान झाले आहेत. सध्या पुणे शहरात पेट्रोलचा दार १०५.५४ एवढा असून डिझेल देखील ९२.३६ रुपये झाले आहे.
मुंबईतही नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी, पीएनजी गॅसच्या दरात वाढ केली होती. सीएनजीच्या दरात प्रति किलो 3.50 रुपये आणि पीएनजीच्या दरात 1.50 प्रति किलोची दरवाढ करण्यात आली होती.
मुंबईत सीएनजीचा दर 89.50 रुपये प्रति किलो आणि पीएनजी 54 रुपये प्रति एससीएम इतका झाला आहे.