आपल्यापैकी अनेकजण आपल्या आरोग्याची काळजी घेत असतील. आपल्याला काहीही होऊ नये म्हणून आधीच तयारी करत असतात. त्यात नियमित आरोग्य तपासणी असो वा इतर काही गोष्टींकडे लक्ष दिले जाते. पण अशा काही समस्या असतात त्या उद्भवू शकतातच. त्यापैकी एक म्हणजे हाता-पायाला सतत मुंग्या येणं.
तुमच्याही हाता-पायाला सतत मुंग्या येत असतील तर काही घरगुती उपाय आहेत त्याचा अवलंब केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. सुकामेवा यावर गुणकारी ठरू शकतो. विशेषत: बदामामध्ये व्हिटॅमिन-ई जास्त प्रमाणात असते. त्यामुळे आपल्या आहारात सुकामेवा असेल याची खात्री करा. त्यामुळे व्हिटॅमिन-ईची कमतरता दूर होण्यास मदत होते. ज्यांना सतत हातापायाला मुंग्या येतात, त्यांनी आपल्या आहारात मोड आलेली कडधान्ये आणि व्हेज ऑईलचा समावेश करायला हवा. यामध्ये व्हिटॅमिन बी जास्त प्रमाणात असल्याने ते आरोग्यासाठी फायदेशीर असते.
सूर्यफुलाचे तेल आणि राजमा यामध्येही व्हिटॅमिन बी चांगल्या प्रमाणात असल्याने आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास मुंग्या येण्याची समस्या कमी होऊ शकते. हाता-पायांना मुंग्या आल्या तर त्यांची हालचाल करावी. त्यामुळे त्यावर येणारा ताण कमी होतो आणि हालचाल झाल्याने मुंग्या कमी होण्यास मदत होते.