सहारनपूर: उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील रहिवासी असलेल्या व्यापारी आणि त्याच्या पत्नीने गंगा नदीत उडी मारून आत्महत्या केली. दोघेही दुचाकीने हरिद्वारला पोहोचले. त्यानंतर येथे त्यांनी सेल्फी घेतला. सुसाईड नोट देखील बरोबर आणली होती. ती सुसाईड नोट आणि सेल्फी एका मित्राला व्हॉट्सॲपवर पाठवला. त्यानंतर पती-पत्नीने गंगा नदीत उडी घेतली. पोलिसांनी पतीचा मृतदेह ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. तर, पोलिसांना अद्याप पत्नीचा मृतदेह सापडलेला नाही. तिचा शोध सुरू आहे.
दाम्पत्याने टाकलेल्या सुसाईड नोटनुसार दोघेही कर्जामुळे त्रस्त होते. या कारणास्तव त्यांनी हे पाऊल उचलले. आमच्याकडे दोन प्रॉपर्टी असल्याचेही लिहिले आहे. आम्हाला ते आमच्या दोन्ही मुलांना द्यायचे आहेत. तोपर्यंत मुलांची काळजी त्यांच्या आजी-आजोबांकडून घेतली जाईल. कारण आमचा दुसऱ्यावर अजिबात विश्वास नाही. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ बब्बर असे मृत सराफा व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पत्नीचे नाव मोना बब्बर होते. घटनेच्या दिवशी म्हणजे 10 ऑगस्ट रोजी दोघेही बाईकवर सुमारे 100 किमीचे अंतर कापून हरिद्वारला पोहोचले. त्यानंतर शेवटच्या वेळी एकत्र सेल्फी काढला आणि मित्राच्या व्हॉट्सॲपवर सुसाईड नोटसह पाठवला. यानंतर त्यांनी गंगेत उडी घेतली.
व्हॉट्सॲपवर सुसाईड नोट आणि फोटो शेअर करणाऱ्या मित्राने लगेच सौरभ बब्बरच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली आणि कुटुंबीयांनी तत्काळ पोलिस गाठले. त्यानंतर सौरभ आणि मोनाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. बऱ्याच प्रयत्नांनंतर हरिद्वारच्या राणीपूर कोतवाली भागातील गंगा कालव्यामध्ये सौरभचा मृतदेह सापडला. सौरभचा मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण कुटुंबात खळबळ उडाली आहे. मात्र, पत्नी मोना बब्बरचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. पोलिस आणि गोताखोर मोनाचा शोध घेत आहेत.
उद्योगपती सौरभ यांच्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज असल्याचे सांगण्यात येत आहे. व्याजाच्या हप्त्यामुळे ते त्रस्त होते. बळजबरीने त्यांनी पत्नी मोनासोबत हरिद्वारच्या गंगेत उडी मारून आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये सौरभने लिहिले, ते कर्जात बुडाले असून व्याजाने त्रस्त आहे. आता आमच्याकडून आणखी व्याज दिले जाऊ शकत नाही. म्हणूनच आपण मृत्यूला कवटाळणार आहोत. जिथून आत्महत्या करणार आहे तिथून सेल्फी पाठवणार असल्याचेही नोटमध्ये म्हटले आहे.
सौरभचा मृतदेह सोमवारी (12 ऑगस्ट) गंगा नदीत सापडला होता, मात्र अद्याप त्याच्या पत्नीचा शोध लागलेला नाही. या घटनेनंतर व्यावसायिकाच्या कुटुंबात खळबळ उडाली आहे. सौरभ यांचा मृतदेह सहारनपूरला आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, पोलीस आणि गोताखोर त्याच्या पत्नीचा शोध घेत आहेत.