भिगवण : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आयोजित केलेल्या शिवस्वराज्य यात्रेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शिवनेरी वरुन सुरुवात करण्यात आलेली ही यात्रा आज इंदापुर तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या भिगवण येथे पोहोचली. या यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
भिगवण शहरात शिवस्वराज्य यात्रा आल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रविण माने या प्रमुखांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला तर खासदार सुप्रिया सुळे यांचे देखील स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जेसीबी मधून मान्यवरांच्या वरती फुलांची उधळण केली.
यावेळी प्रवक्ते दादासाहेब थोरात, समन्वयक आप्पासाहेब गायकवाड, किरण रायसोनी यांनी शिवस्वराज्य यात्रेची संकल्पना शिवाजी महाराजांच्या आदर्श राज्यकारभाराला प्रेरणा मानून यात्रा काढण्यात आली. यावेळी भिगवण मधील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचे आयोजन भिगवण शेटफळगढे गटातील कार्यकर्त्यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, अशोकराव घोगरे, सागर बाबा मिसाळ, रमेश बाबा धवडे, केशवराव भापकर, शशिकांत काटे, अनिल तांबे, सचिन शेलार, कुंडलिक धुमाळ, सलमान शेख, सोहेल बारसकर, कमलेश शेलार, अजिनाथ बंडगर, मनोज सस्ते, उत्तम चौधर, योगेश चव्हाण, सागर जगदाळे, निलेश मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.