पुणे : गेले काही दिवस राज्यात पावसाने हैदोस घातला होता. परंतु आता बहुतांश भागात पाऊस ओसरल्याच चित्र आहे. अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहिले असून तर धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट..
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील सहा जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे तर विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्या यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सहा जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून त्यामुळं या जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.