Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 आता त्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा आज 10 ऑगस्ट रोजी 15 वा दिवस आहे. दरम्यान कुस्तीतून पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर येत आहे. कुस्तीच्या महिलांच्या 76 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेतील उप-उपांत्यपूर्व फेरीत भारतीय कुस्तीपटू रितिका हुड्डा हिने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत एकूण 6 पदके जिंकली आहेत. रितिकाने उप- उपांत्यपूर्व फेरीत हंगेरीच्या बर्नाडेट नेगीचा तांत्रिक श्रेष्ठतेने 12-2 असा पराभव केला. आता रितिका उपांत्यपूर्व फेरीत कझाकस्तानची कुस्तीपटू आयपेरी मेडेट किझीशी भिडणार आहे. आज 15 व्या दिवशी भारतीय महिला कुस्तीपटू रितिका हुड्डा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कुस्तीमध्ये पदक जिंकेल अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक, 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकले. त्यानंतर मनू भाकर-सरबज्योत सिंग या जोडीने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. यानंतर स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले. भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकून भारताला चौथे पदक मिळवून दिले.
यानंतर नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्यपदक जिंकले. तर कुस्तीपटू अमन सेहरावतने 57 किलो कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकून सहावे पदक मिळवले.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 आता त्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा आज 10 ऑगस्ट रोजी 15 वा दिवस आहे. दरम्यान कुस्तीतून पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर येत आहे. कुस्तीच्या महिलांच्या 76 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेतील उप-उपांत्यपूर्व फेरीत भारतीय कुस्तीपटू रितिका हुड्डा हिने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.