पुणे : गेले दोन आठवडे राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती, आता मात्र राज्यातील पाउस ओसरल्याचे चित्र आहे. पावसाचा जोर कमी झाल्याचं बघायला मिळत आहे. मागील काही दिवसात राज्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आजही राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
‘या’ भागात यलो अलर्ट..
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज रायगड जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.