पिंपरी : दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफी पेढीत आलेल्या बंटी बबलीने ५७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना शनिवारी (दि. ३) सकाळी ११ वाजता रहाटणी येथील मनपुरम ज्वेलरी शॉप येथे घडली. गणेश चतुर वायफुले (वय ४५, रा. पानमळा, पुणे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात जोडप्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रहाटणी येथील मनपुरम ज्वेलरी शॉपमध्ये काम करतात. त्यांच्या दुकानात शनिवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास एक जोडपे दगिने खरेदीच्या बहाण्याने आले. आरोपींनी हातचलाखीने ५७ हजार ५०० रुपये किमतीचे चार सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. हा प्रकार लक्षात आला असता त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.