पुणे : भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याशी एका पोलीस कर्मचाऱ्यानी फोनवर गैरवाजवी शब्द वापरुन आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अमित अरुण देशमुख असं पोलीस कर्मचाऱ्याच नाव आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी हे आदेश काढले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, एका जमिनीच्या वादाबाबत राजेश सांकला, रमेश कावेडिया, जगदीशप्रसाद आगरवाल यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जाची चौकशी पोलीस कर्मचारी देशमुख यांच्याकडे होती. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी फोनवर त्यांच्याशी संपर्क साधला.
मात्र, अमित देशमुख यांनी महेश लांडगे हे लोकप्रतिनिधी असताना कोणतेही भान न ठेवता मराठी माणुस हा एक ब्लॅकमेलर आहे, अशा प्रकारचे गैरवाजवी शब्द वापरुन त्यांच्याशी आक्षेपार्ह वक्तव्य केले. या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर अमित देशमुख यांची खात्यामार्फत चौकशी केली. यामध्ये देशमुख दोषी आढळले. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.