Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

HSRP नंबर प्लेट लावणे बंधनकारक; काय आहे नंबर प्लेट बसवण्याची प्रक्रिया? जाणून घ्या सविस्तर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 14 August 2025, 17:36

1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्लेट बसविण्याची अंतिम मुदत पूर्वी 1 एप्रिल होती, मात्र मुदतवाढ देऊन ती 15 ऑगस्ट 2025 करण्यात आली होती. या तारखेपर्यंत नंबर प्लेट बसवली नाही तर मोटर वाहन कायदा 1988 नुसार 1000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.

HSRP ही अॅल्युमिनियमची बनविलेली विशेष नंबर प्लेट असून त्यावर युनिक लेसर-कोरलेला 10 अंकी पिन, होलोग्राम व रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह फिल्म असते. ही प्लेट बनावट तयार करणे अवघड असल्याने वाहन चोरी व फसवणूक रोखण्यासाठी ती उपयुक्त ठरते.

सायबर फसवणुकीची वाढ
नवीन नंबर प्लेट लावताना काहीजण बनावट वेबसाईट व फसव्या संदेशांना बळी पडत आहेत. अशाच प्रकारात भंडारा जिल्ह्यातील एका प्राध्यापिकेची 1000 रुपयांची फसवणूक झाली. गुगलवर शोध घेताना त्यांनी एका फसव्या वेबसाईटवरून नोंदणी केली, शुल्क भरले, मात्र पावती वा प्लेट बसविण्याची तारीख मिळाली नाही. नंतर अधिकृत वेबसाईटवरून केवळ 531 रुपयांत त्यांनी योग्य प्लेट मिळवली.

नागपूरचे सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी सांगितले की, व्हॉट्सअपवर किंवा गुगलवर दिसणाऱ्या अनोळखी लिंकवरून नोंदणी करू नये. तिसऱ्या व्यक्तीद्वारे किंवा दलालामार्फत न जाता थेट शासकीय वेबसाईटवरूनच नोंदणी करावी.

 

अधिकृत प्रक्रिया
HSRP साठी नोंदणी करताना फक्त अधिकृत शासकीय वेबसाईट https://transport.maharashtra.gov.in वापरावी. ‘gov.in’ असा शेवट असलेली वेबसाईट हीच अधिकृत असते.

-वेबसाईटवर HSRP पर्यायावर क्लिक करून आपल्या वाहनाच्या आरसीवरील माहिती भरावी.

-दुचाकींसाठी शुल्क 450 रुपये + 18% जीएसटी (एकूण 531 रुपये) आहे.

-चारचाकी, जड व तीनचाकी वाहनांसाठीही शासनाने निश्चित शुल्क आहे.

-शुल्क भरल्यानंतर ओटीपीद्वारे पुष्टी करून होम डिलिव्हरी किंवा सेंटरवर बसविण्याचा पर्याय निवडावा.

-नंतर बसविण्याची तारीख व पावती मिळते.

ऑनलाईन अडचण आल्यास परिवहन विभागाच्या हेल्प डेस्कवर जाऊन नोंदणी करता येते. मात्र दलालांकडून होणाऱ्या फसवणुकीपासून बचावासाठी थेट विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन अधिकारी करत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींनो देवभाऊ तुमच्यासाठी घेऊन येणार आणखी एक योजना! कोण-कोण घेऊ शकणार लाभ? जाणून घ्या सविस्तर

Wednesday, 21 October 2026, 20:33

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! स्थानकांवरील किराणा स्टॉलवर चहा, कॉफी आणि शिजवलेल्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी

Wednesday, 21 October 2026, 20:26

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली काळे धंदे! सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; कोंढवा-येवलेवाडीत पोलिसांच्या धाडसी कारवाईत २ महिलांची सुटका

Wednesday, 21 October 2026, 20:23

वर्दीमागचा त्याग; हुतात्म्यांना सलाम! २१ ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिन; कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या शौर्याचे स्मरण

Wednesday, 21 October 2026, 19:45

दसरा मेळाव्यात ठाकरे-शिंदेंची तोफ धडाडली; ‘मतचोरी’वरून एकमेकांवर आरोपांची सरबत्ती

Wednesday, 21 October 2026, 17:54

शेतकऱ्यांना सरसकट ८ लाख रुपये मिळणार? मुख्यमत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेबाबत नवीन माहिती समोर; जाणून घ्या सत्य

Wednesday, 21 October 2026, 16:12
Next Post

NEETच्या परीक्षेत उत्तीर्ण...पण डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्णचं राहिलं; वडील अन् काकांनी मिळून केली पोटच्या लेकीची हत्या; धक्कादायक कारण समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp