पुणे: व्हॉट्सॲप लवकरच एक मोठे फीचर (Big Update) घेऊन येत आहे, ज्यामुळे युजर्स फोन नंबर न देता फक्त युजरनेम (Username) वापरून कोणाशीही चॅट करू शकणार आहे . सध्या कोणालाही मेसेज करायचा असेल तर त्यांचा फोन नंबर सेव्ह करावा लागतो. पण नवीन फीचरमुळे तुम्ही Instagram किंवा Telegram प्रमाणे युनिक युजरनेम फीचर वापरू शकाल. याचा फायदा असा होईल की, अनोळखी लोकांशी संपर्क साधताना तुमचा नंबर सार्वजनिक होणार नाही. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहणार आहे आणि प्रायव्हसी अधिक मजबूत होईल.

व्हॉट्सॲपने ‘युजरनेम रिझर्व्हेशन’ (Username Reservation) फीचर देखील तयार केले आहे. या फीचरमुळे युजर्स आपले पसंतीचे युजरनेम आधीच सुरक्षित करू शकतील. अहवालानुसार, अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.25.28.12 मध्ये या फीचरवर काम सुरू आहे. हे फीचर प्रोफाइल सेक्शनमध्ये फोन नंबर खाली दिसेल, जिथे युजर्स मुख्य युजरनेम प्रणाली सुरू होण्यापूर्वी आपले आवडते नाव नोंदवून ही प्रणाली करू शकतील.
विशेष म्हणजे, या बदलामुळे व्हॉट्सॲप युजर्सची ओळख फोन नंबरवर आधारित राहणार नाही. प्रायव्हसी आणि सुरक्षितता यावर भर दिल्यामुळे हे फीचर जगभरातील युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.







