नवी दिल्ली : सध्या फेस्टिव्ह सीजनमध्ये ऑनलाईनसह ऑफलाईन खरेदीला प्राधान्य दिलं जातं. ही गरज लक्षात घेता Flipkart सह Amazon वर केलेल्या खरेदीवर मोठा डिस्काऊंट दिला जात आहे. Flipkart चा Big Billion Days सेल 27 सप्टेंबरपासून अर्थात उद्यापासून सुरु होत आहे.
जर तुमच्याकडे Flipkart Plus मेंबरशिप असेल तर तुम्ही काही कालावधीपूर्वीच सेलचा लाभ घेऊ शकता. ई-कॉमर्सनुसार, ग्राहकांना HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे 10 टक्क्यांपर्यंत सूट आणि EMI सुविधा देखील मिळेल. त्याच वेळी, प्राईम मेंबर्ससाठी Amazon चा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2024 हा सेल 26 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. तुमच्याकडे प्राइम मेंबरशिप नसल्यास, तुम्ही 28 सप्टेंबरपासून सेलचा लाभ घेऊ शकता.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, SBI कार्डधारकांना सेल दरम्यान 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. ई-कॉमर्स साईट्सच्या या सेलमध्ये स्मार्टफोनवर चांगली सूट मिळू शकते. यामध्ये फोनवर 30 ते 35 हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. इतकेच नाही तर सेलमध्ये अनेक प्रीमियम स्मार्टफोन्सवर 30 हजार रुपयांपर्यंतची सूटही मिळू शकते. यासोबतच जर तुम्ही गेमिंग लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सेलमध्ये चांगला फायदा मिळू शकतो.