सोलापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी विरोधी पक्षनेते असताना ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना (Raju Shetti On Devendra Fadanvis) निशाणा बनवून जोरदार टीका केली आहे. शेट्टी म्हणाले, “विरोधी पक्षनेते असताना दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती, आता ते सत्तेत आहेत तर त्यांनी दुष्काळ जाहीर करावा” अशी आमची मागणी आहे. दुष्काळ जाहीर करता येतं नाही तर विरोधी पक्षनेता असताना त्यांनी का दिशाभूल केली? असा सवलाही शेट्टींनी यावेळी उपस्थित केला.

माढा तालुक्यातील…
माढा तालुक्यातील एका केळी उत्पादक शेतकऱ्याचे सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले असून, जमीन साफ करण्यासाठी 30 हजार रुपये लागतील; मात्र सरकार फक्त 17 हजार रुपये देणार आहे, असे शेट्टी यांनी म्हटले. सोलापूरमध्ये माती वाहून गेली, विहिरी बुजल्या आणि पिकांची गणती करता न येणारं नुकसान झालं आहे.

नेपाळ, बांगलादेश सारखा देश पेटून उठल्याशिवाय राहणार
शेतकरी विरोधीत धोरणे, ऊस दरात 15 रुपये कपात आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. एवढ्या पैशात एखाद्या गावाचा प्रश्न सुटला असता. जर असं राहिलं तर नेपाळ, बांगलादेश सारखा देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असा गंभीर इशाराही शेट्टींनी राज्यकर्त्यांना यावेळी दिला.

तसेच ते म्हणाले, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली नाही तर अधिकारी व मुख्यमंत्री यांना दिवाळी साजरी करु देणार नाही, अशी चेतावणीही त्यांनी दिली.







