Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Karmala: जिंतीत बिबट्याचा धुमाकूळ; घरासमोरील बकरी केली फस्त; ग्रामस्थांमध्ये घबराट

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 7 November 2023, 12:16
leopard seen in jinti karamala solapur

Karmala: जिंती : जिंती (ता. करमाळा) ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी मनोहर पाटील यांची बकरी बिबट्याने फस्त केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. ७) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यापूर्वीही बिबट्याने अनेकदा जनावरांवर हल्ले केले आहेत. पण जिंती येथे बिबट्याने केलेला हल्ला अधिक भयानक आहे, कारण घरासमोरून बिबट्याने बकरी नेल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील जिंती, टाकळी, खातगाव, कोंढार चिंचोली व कात्रज या गावांमध्ये ऊसाची शेती अधिक असल्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. या परिसरातील शेळी, मेंढी, गाई यांच्यावर बिबट्या हल्ले करत आहे. तसेच बिबट्या लोकवस्तीमध्ये शिरकाव करू लागला आहे. अनेक महिन्यांपासून याच परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. त्यामुळे बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

दरम्यान, जिंती परिसरात महाविवरण कंपनीकडून रात्रीच्या वेळी शेतीसाठी विद्युत पुरवठा केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना उभ्या शेतातील पिकांना रात्रीच्या वेळी पाणी द्यावे लागते. रात्रीच्या वेळी शेतकरी एकटाच शेतात दारी धरीत असतो. अशा वेळी बिबट्याने एखाद्या शेतकऱ्यावर हल्ला केल्यावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नागरिकांनी आपल्या गोठ्यांना बंदिस्त करून घ्यावे व शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी जाताना एकटे जाऊ नये. तसेच वनविभागाने या घटनेचे तत्काळ गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित पिंजरा लावावा. – ॲड. नितीन राजेभोसले

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thursday, 10 September 2026, 10:54

शिरूरमध्ये 2 दिवसांत 2 विवाहित महिला, 3 मुलं बेपत्ता; अपहरणाचा संशय, परिसरात खळबळ

Thursday, 10 September 2026, 10:50

दिशा सालियन प्रकरणात मोठी हालचाल! CBI तपासाला वेग; वडिलांचा जबाब ठरणार महत्त्वाचा?

Thursday, 10 September 2026, 10:44

आरोपींना बोनेटला बांधलं, गुडघ्यावर चालवलं; आयुक्तांसह बड्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस

Thursday, 10 September 2026, 10:32

ऐन परीक्षेच्या तोंडावर MPSCचा मोठा निर्णय; गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली

Thursday, 10 September 2026, 10:26
Next Post
Three days after court refused extension, NIA files chargesheet in Pune ISIS module case

Pune News: पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट; सिरियातून मिळत होत्या सूचना; 'एनआयए'च्या दाव्यामुळे खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp