Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jinti News : जिंती येथे बॉबीराजे भोसले जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह खाऊ वाटप

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 12 February 2026, 18:40

Jinti News  जिंती, ता. 12 : “कुणाचाही तंटा असुद्या, जागच्या जागीच मिटवायचा; नागरिकांना पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागू नये, असा विचार बॉबीराजांनी समाजात रुजवला. स्वाभिमान काय असतो, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. वाघासारखे जगण्यासाठी शिकवलेले त्यांचे विचार आजही जिवंत आहेत,” असे प्रतिपादन प्रा. नानासाहेब पवार यांनी केले.

 

Jinti News :जिंती (ता. करमाळा) येथे गुरुवारी (ता. 12) बॉबीराजे भोसले यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांसह मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रा. पवार प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. नितीनराजे भोसले होते. यावेळी मधुकर जगताप, अनिल शेजाळ, बाबू आंबघरे, काशिनाथ गिरंजे, संतोष वारगड, सुरेश झांजुर्णे, सुरेश गुंजाळ, महादेव गिरंजे, सरपंच भागडे पाटील, आजीनाथ मुटके, संतोष गुळवे, सागर गोडसे, बापू शेंडगे यांच्यासह परिसरातील मान्यवर, ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीस बॉबीराजे भोसले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पुढे बोलताना प्रा. पवार म्हणाले, “बॉबीराजे भोसले यांनी समाजात अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण केली. आत्मसन्मान, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचा वारसा त्यांनी पुढील पिढीला दिला. त्यांच्या विचारांमुळेच आज अनेक युवक सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहेत.”Jinti News :

दरम्यान, बॉबीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. एस. यु. राजेभोसले हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच न्यू साई समर्थ पब्लिक स्कूलमधील शेकडो विद्यार्थ्यांना वही, पेन, पुस्तके आदी शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

शेवटी सर्व उपस्थितांनी बॉबीराजे भोसले यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमामुळे जिंती परिसरात सामाजिक ऐक्य आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तपासात दिरंगाई अन् आरोपीला संरक्षण! बोकारोतील 28 पोलिसांवर निलंबनाची कारवाई; पिडित कुटुंबाची सीबीआय चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 23:13

“कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याच्या स्तनांकडे बघणं म्हणजे गुन्हा नाही” मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Wednesday, 15 April 2026, 22:51

राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाले नवे अतिरिक्त आयुक्त

Wednesday, 15 April 2026, 22:12

“आम्ही सेवा देणारे, माफिया नाही”; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

Wednesday, 15 April 2026, 21:28

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

Wednesday, 15 April 2026, 20:46

भोंदूबाबा अन् त्याच्या पोलीस पत्नीचा कारनामा! अलौकीक शक्तींच्या नावाखाली मैत्रिणीलाच फसवलं; अघोरी विधी केले, घरात आत्मा आहे सांगितलं अन्…

Wednesday, 15 April 2026, 20:08
Next Post
Mumbai

Mumbai : उद्या सकाळी दादरला जाताय? आधी 'हे' नवे मार्ग पाहा; सायन-एलफिन्स्टन पुलाच्या कामामुळे मुंबईत मोठं ट्रॅफिक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.