Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यावर समजते आयुर्वेदाचे महत्त्व : सीईओ मनीषा आव्हाळे

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 22 March 2024, 21:23
Ayurveda plays important role in life says Solapur ZP CEO manisha ahwal

करमाळा : काही गोष्टी आपणास परंपरेने मिळतात. मात्र, त्या आपण विसरून जातो. आयुष्य जगत असताना आपणास जेव्हा अडचणी अथवा आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात, तेव्हाच आयुर्वेदाचे महत्त्व याची आपणास जाणीव होते, असे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सांगितले.

करमाळा तालुक्यातील जिंती येथे आयोजित आयुष शिबिर प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विलास सरवदे, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय वरवटकर, गटविकास अधिकारी मनोज राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोमल शिर्के, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी व इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मनीषा आव्हाळे म्हणाल्या की, ”माझा आयुर्वेदबाबत चांगला अनुभव असून, मला आयुर्वेदाचे महत्त्व पटलेले आहे. आयुर्वेदात पथ्यपाणी खूप पाळावे लागतात व ते पाळणे गरजेचे असते. प्रत्येकाने किमान एक औषधी वनस्पती झाडाची लागवड शेतात किंवा आपल्या अंगणात करावी, जुन्या गोष्टीचे महत्त्व न विसरता आत्मसात करणे, त्याचबरोबर निसर्गापासून दूर न जाता निसर्गास आत्मसात करा, निसर्ग आपणास भरभरून देणार, त्याचबरोबर आजी बाईचा बटवा हा आपला अमूल्य ठेवा आहे ती काळाची गरज असून, आपण तो जोपासला पाहिजे”.

आयुष ग्राम जिंती हा भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचा उपक्रम आहे. गेल्या तीन वर्षांपासून जिंती व पंचक्रोशीतील नागरिकांना रुग्णांना आयुर्वेद व योगचा फायदा होत आहे. स्तनाचा कर्करोग या आजाराचे प्रमाण महिला वर्गांमध्ये जास्त असून, महिलांनी या आजाराविषयी कुठलीही शंका अथवा भीती न बाळगता निसंकोचपणे तपासण्या करून घेणे गरजेचे आहे, असेही मनीषा आव्हाळे यांनी उपस्थित महिलांना सांगितले.

यावेळी आयुषग्राम कॅलेंडरचे व योग पुस्तिकेचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच करमाळा तालुक्यातील 50 अतिदुर्गम भागातील लोकांना आरोग्याची सेवा पुरवण्यासाठी नुकतीच मोबाईल मेडिकल युनिटची स्थापना करण्यात आली. त्या फिरते वाहनाची व पथकाची पाहणी मनीषा आव्हाळे यांनी केली.

आयु म्हणजे जीवन

आयु म्हणजे जीवन, वेद म्हणजे शास्त्र अशी आयुर्वेद या शब्दाची निरुक्ती आहे. उपलब्ध असलेल्या वनौषधी, आहार, व्यायाम, योग, प्राणायाम या माध्यमातून आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे. निदान प्रोजेक्ट या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या सेस फंडामध्ये भरीव निधीची तरतूद करून ठेवण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.

यावेळी सुमारे 700 रुग्णांनी आयुष शिबिराचा लाभ घेतला. तसेच 11 तालुक्यातील 22 आरोग्यसेविका यांना प्रोजेक्ट निदान अंतर्गत स्तनाचा कर्करोग तपासणीसाठीच्या थर्मल स्कॅनिंग मशीनचे प्रशिक्षण स्त्रीरोग तज्ञांमार्फत देण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विलास सरवदे यांनी शासकीय आयुर्वेद दवाखाना जिंतीचा प्रवास कथन करून अंतरंग उलगडले. तर जिंती आयुष ग्रामचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब गाढवे यांनी आभारप्रदर्शन केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उजनीतील प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! ३१ ऑक्टोबरला रास्ता रोको; रोहित पवार नेतृत्व करणार

Sunday, 25 October 2026, 16:50

उरुळी कांचन येथे चावी शोधून घरफोडी! सव्वा दोन लाखांचे दागिने लंपास, आश्रम रोडवरील घटना

Sunday, 25 October 2026, 16:46

लाडक्या बहिणींनो महिन्याअखेर ३ हजार रुपये खात्यात येणार? सरकार देणार का दिवाळी गिफ्ट? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

Sunday, 25 October 2026, 16:43

इंदापुरात तरुणीचा कारमधून पाठलाग; नंबर, सोशल मीडिया आयडी मागितल्याचा आरोप

Sunday, 25 October 2026, 16:28

केडगाव येथे तोतया पोलिसांचा वृद्धाला तब्बल अडीच लाखांचा गंडा! ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत सोन्याची चैन व दोन अंगठ्या हातचलाखीने लंपास

Sunday, 25 October 2026, 16:06

ST कर्मचाऱ्यांनो दिवाळीआधी पगार होणार की नाही? परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर…

Sunday, 25 October 2026, 16:03
Next Post
ED gets 6-day custody Delhi CM will not change says AAP

कोठडीतच साजरी होणार अरविंद केजरीवाल यांची होळी, 28 मार्चपर्यंत ईडीला मिळाली कस्टडी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp