Saturday, June 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ahilyanagar Crime: ‘तो माजलाय, त्याला जन्माची अद्दल घडवू’ बायकोला धमकी, नवऱ्याचं अपहरण, क्रूरपणे हत्या करून बॉडी टायरमध्ये टाकली अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 8 January 2026, 13:26
Ahilyanagar Crime: 'He is a fool, we will make him live his life' Wife threatened, husband kidnapped, brutally murdered and body thrown in a tire...

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी (Ahilyanagar Crime) येथे तरुणाचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस (Nagar News) आली आहे. हत्या केल्यानंतर (Pune Crime) मृतदेह टायर आणि डिझेलच्या सहाय्याने जाळून पुरावे नष्ट करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सराईत गुन्हेगार दिपक पोकळे, प्रविण वाघमारे आणि त्यांच्या इतर साथीदारांना अटक केली आहे. अनैतिक संबंध आणि पैशांच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपींनी पोलिसांसमोर दिली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, 10 डिसेंबर 2025 रोजी शिर्डी येथील सचिन कल्याणराव गिधे यांचे अपहरण करण्यात आले होते. सचिन हा साई सुनिता हॉटेल, शिर्डी येथे गेल्यानंतर घरी परत न आल्याने त्याच्या पत्नी श्रध्दा गिधे यांनी 15 डिसेंबर 2025 रोजी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून प्रविण उर्फ पचास वाघमारे आणि दिपक अंबादास पोकळे यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, अपहरणानंतर आरोपी सातत्याने ठिकाणे बदलत पोलिसांना गुंगारा देत होते.

तपासादरम्यान आरोपींनी सचिन गिधे याची हत्या करून मृतदेह जाळल्याची माहिती पोलिसांना दिली. दिपक पोकळे हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी मोक्का, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडे आणि जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

दरम्यान, प्रविण वाघमारे याने याच दिवशी आणखी एक गंभीर गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 10 डिसेंबर 2025 रोजी गौतम कैलास निकाळे या तरुणाला घरातून फसवणुकीने बाहेर नेऊन उपासने बाबा मंदिराच्या पाठीमागील परिसरात नेऊन लाथा-बुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून त्याचा पाय फ्रॅक्चर करण्यात आला होता. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल आहे.

अपहरित तरुणाचा शोध न लागल्याने सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकाने संगमनेर तालुक्यातील मेंढवण परिसरात सापळा रचून आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली. सध्या या हत्येचा पुढील तपास राहाता पोलीस करत असून संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पवनराजे निंबाळकर हत्याकांड निकाल! आरोपींची सुटका, ओमराजेंच्या भूमिकेमुळे ‘ऑपरेशन टायगर’ मध्ये पेच

Saturday, 20 June 2026, 14:49

नीट फेरपरीक्षेसाठी पुणे पोलीस सज्ज; 63 केंद्रांवर प्रत्येक ठिकाणी 20 पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Saturday, 20 June 2026, 14:22

विवस्त्र करून मारहाण, शॉकचे चटके अन् अनुयायांसमोरच बलात्कार; पुण्यात भोंदूबाबाच्या आश्रमात तरुणीसोबत घडलं भयंकर

Saturday, 20 June 2026, 14:07

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी 20 वर्षांनंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Saturday, 20 June 2026, 13:38
ai image

नोकरी सोडायला लावली, घरात कोंडले अन् निवृत्त एसीपी सासऱ्याने केली ‘शरीरसुखाची’ मागणी; कोंढव्यात विवाहितेचा छळ

Saturday, 20 June 2026, 13:29

पावसाची हुलकावणी अन् उष्णतेचा दाह! 23 जूननंतर पावसाची शक्यता

Saturday, 20 June 2026, 13:06
Next Post
Crime News: Shocking incident..! Wife found with lover in an unwanted situation; When husband got angry, what did lover do...

Crime News: घटस्फोटाच्या वादातून तरुणाची हत्या, १८०० किलोमीटरचा फिल्मी पाठलाग; आरोपी गजाआड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.