Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भरधाव कार थेट बंगल्यात घुसली; दोन कुटुंबांतील पाच जणांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 5 June 2025, 14:29

नाशिक: नाशिक-कळवण महामार्गावर बुधवारी रात्री एक अत्यंत भीषण अपघात घडला असून, भरधाव वेगात असलेली कार थेट एका बंगल्यात घुसल्यामुळे दोन कुटुंबांतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोल्हापूर फाट्यावर रात्री १० वाजताच्या सुमारास हा हृदयद्रावक अपघात घडला.

नामपूर येथील भदाण कुटुंब आणि देवळा येथील मेतकर कुटुंब नाशिक येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी आले होते. लग्नसमारंभ आटोपून सर्वजण एका कारमधून सटाण्याकडे परत जात होते. मात्र, कोल्हापूर फाट्याजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि भरधाव वेगात असलेली कार थेट रस्त्यालगत असलेल्या विठोबा शंकर अहेर यांच्या बंगल्यात घुसली. कारने बंगल्याच्या सिमेंटच्या खांबाला जबर धडक दिली आणि खांब वाकवून कार आतमध्ये शिरली. या धडकेचा आवाज इतका जबरदस्त होता की परिसरातील लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पाच जणांचा जागीच मृत्यू

या भीषण अपघातात कार चालक आणि चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये खालिक मेहमूद पठाण (५०, रा. नामपूर, ता. सटाणा), माधवी मेतकर (३२, रा. देवळा), त्यांची चिमुरडी मुलगी त्रिवेणी मेतकर (४), शैला वसंत भदाण (६२) आणि सरला भालचंद्र भदाण (५०) यांचा समावेश आहे. या अपघातात उत्कर्ष मेतकर (१२, रा. देवळा) आणि भालचंद्र भदाण (५२, रा. नामपूर) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

 

अपघात घडल्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. कारमधील जखमी व अडकलेल्यांना बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताच्या तीव्रतेवरून हा थरकाप उडवणारा क्षण होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन सेवांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून बचावकार्य केले.या अपघाताने भदाण आणि मेतकर कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आनंदी क्षण साजरे करून परतणाऱ्या या कुटुंबांचे आयुष्य एका क्षणात उध्वस्त झाले. विशेषतः एका छोट्या चिमुकलीच्या मृत्यूमुळे वातावरण अधिकच हळहळजनक झाले आहे. संपूर्ण नामपूर, देवळा आणि सटाणा परिसरात शोककळा पसरली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लोणी काळभोर येथील राजधानी बेकरीतून तीन महिन्यांपूर्वी एक्सपायर झालेल्या चॉकलेटची विक्री; वाढदिवसानिमित्त शाळेत केले त्याच चॉकलेटचे वाटप..

Saturday, 3 October 2026, 18:26

अन् त्या दोघींनी चक्क स्वतःच्या अंगावरच्या साड्या काढून दोरखंड बनवला! तुरुंगात महिलांचा विचित्र प्रकार; फिल्मी स्टाईल पलायनाचा थरार

Saturday, 3 October 2026, 18:15

एसपींच्या बदली आदेशांनाच ‘ब्रेक’; जुन्याच ठिकाणी पोलिसांचे ठाण? पुणे ग्रामीण पोलिस दलात बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; कार्यमुक्तीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

Saturday, 3 October 2026, 18:09

खासगी बँक कर्मचाऱ्यांना 5 डे वर्किंग मिळणार? सोमवार-शुक्रवार बँकिंगच्या मागणीवर RBIचा निर्णय काय?

Saturday, 3 October 2026, 18:08

‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली; तरी कर्ज फिटेना!’ चिठ्ठी लिहून शेतकऱ्यान उचललं टोकाचं पाऊल..

Saturday, 3 October 2026, 17:53

पुण्यात भाईगिरीचा प्रकार! ‘तू लय मोठा झाला का? माझ्याशी दुश्मनी परवडणार नाही” म्हणत तरुणाच्या अंगावर कुत्रा सोडत मारहाण..

Saturday, 3 October 2026, 17:46
Next Post

वरिष्ठ अधिकारी जालंदर सुपेकरने 500 कोटींची केली मागणी,150 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp