Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

42 वर्षीय महिलेचं 27 वर्षीय तरुणावर प्रेम! प्रियकरासाठी पती- मुलाला केलं दूर; नवऱ्याला आला राग अन् असा झाला प्रेमप्रकरणाचा शेवट

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 25 August 2026, 14:06

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील तरटगाव येथील 27 वर्षीय तरुणाचा प्रेमप्रकरणातून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अरविंद बाळू मस्के असे मृत तरुणाचे नाव आहे. सोशल मीडियावरून तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील 42 वर्षीय महिलेशी त्याची ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाल्याचे सांगितले जात आहे.

अरविंद हा ट्रॅक्टर चालक होता आणि आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. गेल्या काही महिन्यांपासून तो संबंधित महिलेशी फोनवरून संपर्कात होता. एप्रिलमध्ये महिला अरविंदच्या घरी आली होती. त्यावेळी ती दोन दिवस तेथे राहिली. त्यानंतर ती पुन्हा तरटगावला आली आणि अरविंदसोबत लग्न करण्याचा आग्रह धरल्याचे समोर आले आहे.

महिलेचा पती तिला घेण्यासाठी आला असता तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. तसेच तिने स्वतःचे काही बरेवाईट करून घेण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे महिलेचा पती तेथून परत गेला.

यानंतर काही दिवसांनी महिलेचा पती, मुलगा आणि अन्य व्यक्ती तरटगावला आले. मात्र, त्यावेळी महिला घरी नव्हती. 13 ऑगस्ट रोजी अरविंद घरी आल्यानंतर त्याला संबंधित महिलेने भेटण्यासाठी बोलावल्याचे त्याने आईला सांगितले. 15 ऑगस्ट रोजी तो महिलेला भेटण्यासाठी घरातून बाहेर पडला.

आरोपानुसार, त्यानंतर महिलेचा पती, मुलगा आणि त्यांच्या साथीदारांनी अरविंदला पकडून माळुंब्रा येथे नेले. तेथे त्याला झाडाला बांधून लाकूड, वायर आणि हाताने मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात अरविंद गंभीर जखमी झाला.

 

यानंतर संशयितांनी त्याला तामलवाडी पोलीस ठाण्यात नेले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने पोलिसांनी उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच 22 ऑगस्ट रोजी अरविंदचा मृत्यू झाला.

या प्रकरणी अरविंदच्या आईने तामलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपअधीक्षक मनोहर पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास अभियंता-ठेकेदारांवर होणार गुन्हा दाखल; 7 दिवसांत रस्ते दुरुस्तीचे आदेश

Saturday, 3 October 2026, 15:24

‘माझा मुलगाही त्या सहलीला गेला’ आळंदी पोलीस ठाण्यात बैठकीतच मृत्यूची यादी समोर आली; सर्व पोलिसांचे डोळे पाणावले, काळजाचा ठोका चुकवणारा क्षण

Saturday, 3 October 2026, 15:24

‘गे डेटिंग’ ॲपवर ओळख; पुण्यातल्या तरुणाला निर्जनस्थळी भेटायला बोलावलं अन् पडक्या खोलीत नेत तिघांचं भयानक कृत्य…

Saturday, 3 October 2026, 15:18

मिनाक्षी शिंदेंच्या अडचणी वाढल्या! पूर्णेकर हत्याकांडात चौकशीची टांगती तलवार; मोठी अपडेट समोर

Saturday, 3 October 2026, 15:03

IND vs PAK Asian Games 2026 Final: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम! फायनलमध्ये पाकिस्तानला १९ धावांनी धुडकावत टीम इंडियाने पटकावले सुवर्णपदक

Saturday, 3 October 2026, 14:58

सरकारचा शब्द कागदावरच; संगणक परिचालकांचे मानधन पुन्हा रखडले!

Saturday, 3 October 2026, 14:41
Next Post

डोळ्यांवर पट्टी, हातात पेन्सिल अन् गणिताचा भन्नाट वेग! लोणी काळभोर येथील सख्ख्या भावांनी रचला विक्रमांचा दुहेरी इतिहास; श्रीयशला ‘ग्रँड मास्टर’ किताब, तर वेदांतने भागाकारात गाठला विक्रम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp