Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डोळ्यांवर पट्टी, हातात पेन्सिल अन् गणिताचा भन्नाट वेग! लोणी काळभोर येथील सख्ख्या भावांनी रचला विक्रमांचा दुहेरी इतिहास; श्रीयशला ‘ग्रँड मास्टर’ किताब, तर वेदांतने भागाकारात गाठला विक्रम

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 25 August 2026, 14:30

लोणी काळभोर : डोळ्यांवर पट्टी बांधलेली… समोर कागद-पेन्सिल… आणि अवघ्या एका मिनिटात गणिताच्या अवघड आकड्यांचा अचूक हिशेब! ऐकायला अविश्वसनीय वाटणारी ही कामगिरी श्रीयश अमित सिद पाटील आणि वेदांत अमित सिद पाटील या सख्ख्या भावांनी प्रत्यक्षात करून दाखवली आहे. त्यांच्या असामान्य गणितीय कौशल्याची दखल घेत श्रीयशने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मानाचा ‘ग्रँड मास्टर’ किताब पटकावला, तर वेदांतनेही इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले नाव कोरले आहे.

श्रीयश अमित सिद पाटील याने वयाच्या अवघ्या 14 वर्षे 1 महिन्यांच्या वयात, डोळ्यांवर पट्टी बांधून केवळ एका मिनिटात 4अंकी × 1 अंकी अशा तब्बल 21 गुणाकारांची अचूक उत्तरे कागद व पेन्सिलच्या सहाय्याने सोडवली. या असामान्य कामगिरीची दखल घेत त्याला “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून ‘महागुरू’ हा मानाचा किताब” हा मानाचा किताब प्रदान करण्यात आला.

भावाच्या पावलावर पाऊल ठेवत वेदांत अमित सिद पाटील यानेही आपल्या गणितीय कौशल्याची झलक दाखवून दिली. त्याने डोळ्यांवर पट्टी बांधून अवघ्या एका मिनिटात तीन अंकी संख्यांचे बाकी रकमेसह तब्बल 24 भागाकार अचूक सोडवून I “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये विक्रम नोंदविला.श्रीयश आणि वेदांत यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्रासह भारताचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे. त्यांच्या यशामुळे परिसरातील तसेच शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना मानसिक गणित, बौद्धिक विकास, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढविण्याची प्रेरणा मिळत आहे.

एक नववीत, दुसरा सातवीत; गणितात मात्र विक्रमांची भरारी!

 

श्रीयश हा सध्या इयत्ता नववीत, तर वेदांत इयत्ता सातवीत शिक्षण घेत असून दोघेही एंजल हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. एवढ्या कमी वयात दोन्ही भावांनी मिळविलेली ही विक्रमी कामगिरी त्यांच्या असामान्य स्मरणशक्ती, एकाग्रता, मानसिक वेग, गणितीय कौशल्य, सातत्यपूर्ण सराव आणि कठोर परिश्रमाचे उत्तम उदाहरण मानली जात आहे. डोळ्यांवर पट्टी बांधून अवघ्या एका मिनिटात गणिती उदाहरणे अचूक सोडविण्यासाठी केवळ गणिताचे ज्ञान पुरेसे नसते; त्यासाठी विलक्षण एकाग्रता, वेगवान मानसिक गणित आणि अचूकतेची आवश्यकता असते. श्रीयश आणि वेदांत यांनी आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीतून ही क्षमता सिद्ध केली आहे.

वडिलांच्याही शिरपेचात मानाचा तुरा!

विशेष म्हणजे श्रीयश आणि वेदांत हे सख्खे भाऊ असून त्यांचे वडील अमित सिद पाटील हे पुणे शहर पोलिस दलात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आपल्या कर्तव्यामध्ये दीर्घकाळ केलेल्या निष्कलंक सेवेची दखल घेत त्यांना देखील 15 ऑगस्ट 2026 रोजी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे एका बाजूला पोलिस सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणारे वडील आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गणितीय विक्रम करणारे दोन मुलगे, अशा या कुटुंबाच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अपर पोलीस आयुक्तांकडून कौतुकाची थाप

पुणे शहर गुन्हे शाखेच्या अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी नुकताच श्रीयश आणि वेदांत यांचा सत्कार करून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, डोळ्यांवर पट्टी बांधून आकड्यांशी खेळ करणाऱ्या या दोन भावांनी आपल्या बुद्धिमत्ता, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर विक्रमांच्या पुस्तकात नाव कोरले आहे. त्यांच्या या यशाने ‘वय लहान असले तरी स्वप्ने मोठी असतील आणि मेहनत प्रामाणिक असेल, तर विक्रमही आपल्या नावावर होऊ शकतो’, हा संदेशच दिला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04
Next Post

ईईss हे काय? पुण्यातल्या नामांकित बेकरीच्या खाद्यपदार्थात आढळली जिवंत अळी; पार्सल उघडून बघताच ग्राहकाच्या पायाखालची जमीन....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp