Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मॅडम प्लिज घरी जाऊ द्या, मला बरं नाही’ ती विनवणी करत राहिली पण तिला खोलीत बंद केलं; १४ वर्षीय विद्यार्थिनीने वसतिगृहात उचललं टोकाचं पाऊल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 13 October 2026, 17:03

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय आश्रमशाळेत आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीचा वसतिगृहात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. राणू कृष्णा हलामी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. काल संध्याकाळी वसतिगृहातील खोलीत पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत ती आढळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विद्यार्थिनीच्या पालकांनी आश्रमशाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राणूची प्रकृती ठीक नसल्याने ती घरी जाण्याचा आग्रह करत होती. मात्र, वसतिगृहाच्या अधीक्षिका दिपाली चांभाळे यांनी तिला खोलीत बंद केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकारामुळे मुलीवर मानसिक तणाव निर्माण झाल्याचा दावाही कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी राणूचे वडील कृष्णा चिनू हलामी आणि आई मनीषा हलामी यांनी केली आहे.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके यांनी कुरखेडा येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. पालक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या आरोपांची दखल घेत त्यांनी आश्रमशाळा व्यवस्थापनासह आदिवासी विकास विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना जाब विचारला.

या प्रकरणात वसतिगृह अधीक्षिकेला निलंबित करण्याचे आणि संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत. या आदेशानंतर पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाईकडे लक्ष लागले आहे.

 

या घटनेमुळे शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता, त्यांच्या तक्रारींची दखल आणि प्रशासनाची जबाबदारी याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. राणूच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती काय होती, पालकांनी केलेल्या आरोपांत कितपत तथ्य आहे आणि चौकशीतून कोण जबाबदार ठरते, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यातून बाहेर चारा नेण्यास सक्त मनाई! दुष्काळामुळे जिल्हा प्रशासनाचा मोठा आणि कडक निर्णय

Wednesday, 14 October 2026, 19:27

मोदी सरकारचा मोठा निर्णय! इंदिरा गांधींच्या नावांच्या 3योजनांची नावे बदलली; कोणत्या आहेत त्या योजना?

Wednesday, 14 October 2026, 18:20

उरुळी कांचन पोलीस ठाण्यात भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या तीन घरमालकांवर गुन्हे दाखल; कांचन वृंदावन सोसायटीतील प्रकार

Wednesday, 14 October 2026, 18:19

निळ्या ड्रम हत्याकांडाचा मोठा निकाल! मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा; मुस्कान ढसाढसा रडली, म्हणाली ” माझ्या दोन्ही मुलांचा…

Wednesday, 14 October 2026, 17:57

तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात मोठा दुजाभाव? राष्ट्रपती-मंत्र्यांनाही बंदी, मग मटका माफियाला थेट दर्शन कसं?

Wednesday, 14 October 2026, 17:52

उरुळी कांचन येथे कार चालवतांनाच आला हृदयविकाराचा झटका! गाडीचं नियंत्रण सुटलं अन् जागीच मृत्यू; २ महिला जखमी

Wednesday, 14 October 2026, 17:33
Next Post

'आई मी थकले, आता सहन होत नाही" चिट्ठी लिहिली अन् पुण्यातल्या IT अभियंत्या विवाहितेसोबत घडलं भयंकर; 'अक्खा पगार दे, घर नावावर कर' या सासरच्या मागण्यांना कंटाळून शेवटी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp