Tuesday, October 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आई मी थकले, आता सहन होत नाही” चिट्ठी लिहिली अन् पुण्यातल्या IT अभियंत्या विवाहितेसोबत घडलं भयंकर; ‘अक्खा पगार दे, घर नावावर कर’ या सासरच्या मागण्यांना कंटाळून शेवटी…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 13 October 2026, 17:48

पुणे : माहेरहून पैसे आणण्यासाठी, सदनिका सासूच्या नावावर करण्यासाठी आणि घटस्फोटाच्या वादातून होणाऱ्या कथित शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून आयटी अभियंता विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना केशवनगर येथे घडली. त्रिष्णा राहुल सकपाळ (वय ३३, रा. केशवनगर, मुंढवा) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

त्रिष्णाचे वडील बाळकृष्ण निकम (वय ७४, रा. केशवनगर) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती राहुल संजय सकपाळ, सासू वैशाली संजय सकपाळ, सासरे संजय मनोहर सकपाळ, नणंद शैली संजय सकपाळ आणि आजेसासू शकुंतला साळुंके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण हडपसर येथील डिफेन्स कॉलनी परिसरात राहतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिष्णाचा विवाह २०१८ मध्ये राहुल सकपाळ याच्याशी झाला होता. लग्नावेळी माहेरच्या मंडळींनी १३ तोळे सोन्याचे दागिने दिले होते. त्रिष्णा एका आयटी कंपनीत नोकरी करत होती. तिचा संपूर्ण पगार सासरच्या मंडळींना द्यावा, तसेच माहेरची सदनिका सासूच्या नावावर करावी, यासाठी तिचा छळ केला जात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सासऱ्यांनी तिच्या नावावर एक कोटी रुपयांची सदनिका घेऊन देण्याचा आग्रह धरल्याचाही आरोप आहे.

वारंवार होणाऱ्या कथित मारहाण आणि छळामुळे त्रिष्णा व तिचा पती २०२१ मध्ये केशवनगर येथे स्वतंत्र राहू लागले. मात्र, तिथेही पतीने मारहाण करून घराबाहेर काढल्याने ती माहेरी राहायला गेली होती. त्यानंतर पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता.

 

दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्रिष्णाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवल्याचे समोर आले आहे. पती, सासू, सासरे, नणंद आणि आजेसासू यांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असून, तेच आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचा उल्लेख चिठ्ठीत असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शिवसेना पक्ष, चिन्ह कोणाला मिळणार? निकाल कधी लागणार? असीम सरोदेंनी स्पष्टच सांगितलं; डेडलाईन सांगत….

Tuesday, 13 October 2026, 17:56

‘आई मी थकले, आता सहन होत नाही” चिट्ठी लिहिली अन् पुण्यातल्या IT अभियंत्या विवाहितेसोबत घडलं भयंकर; ‘अक्खा पगार दे, घर नावावर कर’ या सासरच्या मागण्यांना कंटाळून शेवटी…

Tuesday, 13 October 2026, 17:48

‘मॅडम प्लिज घरी जाऊ द्या, मला बरं नाही’ ती विनवणी करत राहिली पण तिला खोलीत बंद केलं; १४ वर्षीय विद्यार्थिनीने वसतिगृहात उचललं टोकाचं पाऊल

Tuesday, 13 October 2026, 17:03

बाप रे एवढी महागाई! जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या; कांद्याच्या दरात लक्षणीय वाढ, आणखी काय-काय महागलं?

Tuesday, 13 October 2026, 16:41

‘मी यानंतर कॉपी करणार नाही, चूक झाली’ साहिलने दिलं होतं लेखी निवेदन; आत्महत्येपूर्वी मत्रिणीशी साधला होता संवाद, प्रकरणात नवा खुलासा

Tuesday, 13 October 2026, 16:34

थेऊर येथे महावितरणचा ‘हाय व्होल्टेज’ झटका! 3 घरांतील टीव्ही, फ्रीज, महागड्या लाईट जळाल्या, आठ दिवसांत दुसरी घटना

Tuesday, 13 October 2026, 16:25
Next Post

शिवसेना पक्ष, चिन्ह कोणाला मिळणार? निकाल कधी लागणार? असीम सरोदेंनी स्पष्टच सांगितलं; डेडलाईन सांगत....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp