Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Anil Deshmukh: सर्वात मोठी बातमी! अनिल देशमुख हल्ला प्रकरणात मोठी अपडेट; हल्ला खोटा होता?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 30 September 2025, 22:21
Anil Deshmukh: Biggest news! Big update in Anil Deshmukh attack case; Was the attack fake?

Photo-Social Media

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) मोठी घटना मानली गेलेली माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरची हल्ल्याची घटना अखेर फर्जी ठरली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी 19 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या कथित हल्ल्याबाबत नागपूर ग्रामीण पोलिसांनी सखोल तपास केला. फॉरेन्सिक तपासासह विविध पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न झाला. मात्र या तपासात कोणतेही तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे नागपूर ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात ‘बी फायनल’ रिपोर्ट दाखल केला आहे.

या घटनेबाबत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबर 2024 रोजी अनिल देशमुख मुलाच्या प्रचारासाठी गेले होते. नरखेडवरून काटोलकडे परतताना बैलफाटा परिसरात रात्री अंधारात दबा धरून बसलेल्या चार लोकांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केली, असा आरोप करण्यात आला होता. या दगडफेकीत देशमुख यांच्या डोक्याला इजा झाली असून त्यांना नागपूरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले आणि संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणाला मोठा राजकीय रंग चढला. त्या काळात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात होता. देशमुख यांच्यावर झालेला हल्ला ही राजकीय सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेली कथा होती का? असा प्रश्न तेव्हाच अनेकांनी उपस्थित केला होता. पोलिसांनी मात्र यावर निष्पक्ष तपास सुरू केला. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले, फॉरेन्सिक तपास करण्यात आला. मात्र कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत.

अखेर पोलिसांनी या प्रकरणात ‘बी फायनल’ रिपोर्ट दाखल करून ही घटना खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. निवडणुकीच्या काळात वातावरण पेटवण्यासाठी किंवा राजकीय सहानुभूती निर्माण करण्यासाठी ही घटना दाखवण्यात आली होती का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला आला आहे.

 

दरम्यान, या प्रकरणावर आता स्वतः अनिल देशमुख काय भूमिका घेतात, त्यांचे स्पष्टीकरण काय असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण एकेकाळी मोठा राजकीय वादळ निर्माण करणारी ही घटना आता पूर्णपणे कोसळल्याचे पोलिसांच्या रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दौंडच्या जीवनरेखा हॉस्पिटलमधील डॉक्टरसह तिघांवर गुन्हा; बनावट मेडिकल रिपोर्ट, डॉक्टरचा नोंदणी क्रमांक अन् आधारकार्डाचा गैरवापर भोवला!

Friday, 11 September 2026, 16:55

‘इकडे कशाला आलास?’ म्हणत तरुणाला बांबूने मारहाण; फुरसुंगीत तिघांविरोधात तक्रार

Friday, 11 September 2026, 16:30

‘शरीरसंबंधाच्या हेतूनेच तिनं ‘किस’ केलं’ पुण्यात 21 वर्षीय तरुणीवर ‘पोक्सो’ दाखल; लग्नाच्या आमिषाने मुलाला कॅफेत नेलं अन्…

Friday, 11 September 2026, 16:27

जरांगे–दीपके भेटीने राजकारण तापलं! लक्ष्मण हाकेंचा थेट हल्ला, ‘तो अजून बच्चा’

Friday, 11 September 2026, 16:15

पुण्यात दारूबंदीचा मुद्दा ऐरणीवर! हायकोर्ट संतापलं,‘मग कारवाई का होत नाही?’सरकारला थेट सवाल

Friday, 11 September 2026, 15:34

पुण्यात शताब्दी एक्सप्रेसखाली दिसला माणसाचा हात! भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

Friday, 11 September 2026, 15:29
Next Post
Pune Crime: Father and son beat up tempo driver over parking dispute in Balewadi; Hand bone broken

Pune Crime: बालेवाडीत पार्किंगच्या वादातून पितापुत्रांची टेम्पो चालकाला मारहाण; हाताचे हाड तुटले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp