Ranveer Singh: गोवा: हिंदी चित्रपट सुष्टीतील प्रसिध्द अभिनेता रणवीर सिंग वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) च्या समारंभात सादर केलेल्या एका परफॉर्मन्सवरून रणवीर सिंग चांगलाच ट्रोल झाला आहे. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर अभिनेता रणवीर सिंग यांनी स्पष्टिकरण देत माफी मागितली आहे. Ranvver Singh

हेही वाचा- मोठी बातमी…! आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल; मतदान केंद्रात.., प्रकरण काय?
‘कांतारा” या चित्रपटातील ऋषभ शेट्टी यांच्या अभिनयाची नकल केली. त्यांनी जीभ बाहेर काढून देवीचा अपमान केला आणि तसेच स्टेजवर फिमेल घोस्ट असं देखील संबोधले गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत रणवीर सिंगला चांगलंच सुनावले आहे.
समारोप सोहळ्यातील परफॉर्मन्सनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली. लोकांनी रणवीरवर देवीची नक्कल केल्याचा आरोप केला.यावर 02 डिसेंबर रोजी रणवीर सिंगने सोशल मीडियावर माफी मागितली. तो म्हणाला, “मी फक्त ऋषभ शेट्टी यांच्या उत्कृष्ट अभिनयाला आदर देण्यासाठी ते दृश्य सादर केले. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.”
रणवीरविरुध्द पोलीस तक्रार दाखल
रणवीरचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी नापसंती दाखवली आहे. हिंदू जनजागृती समिनीने रणवीरविरुध्द पणजी येथे पोलीस तक्रार दाखल केली. देवीच्या अपमान केल्याविरुध्द त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कर्नाटकमध्ये त्यांच्या या कृत्याचा मोठ्या प्रमाणात निषेध केला जात आहे. दरम्यान रणवीरच्या आगमी चित्रपटाबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.






