मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए (Gauri Anant Garje) अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जे यांनी मुंबईतील राहत्या (Gauri Palave) घरात आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणात नवे तपशील समोर येत आहेत. अनंत आणि गौरी यांचे लग्न फेब्रुवारी महिन्यात झाले होते. मात्र लग्नानंतर काही महिन्यांतच गौरीने आत्महत्या केली. घर शिफ्ट करताना गौरीला काही कागदपत्रे सापडली होती. त्यामध्ये एका महिलेचे नाव आणि तिच्या गर्भपाताची नोंद होती, ज्यात वडिलांच्या ठिकाणी अनंत गर्जे यांचे नाव लिहिले होते. हा मुद्दा गौरी आणि अनंत यांच्यातील वादाचे मुख्य कारण ठरल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली होती. (Breaking News)

या घटनेनंतर वरळी पोलीस ठाण्यात अनंत गर्जेवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अनंतची जुनी प्रेयसी पोलीस ठाण्यात हजर राहून जबाब नोंदवला. 2022 नंतर माझा आणि अनंतचा कोणताही संपर्क नाही आणि गौरीला सापडलेल्या कागदपत्रांबद्दल मला काहीही माहिती नाही, असे तिने पोलिसांना सांगितले.
गौरीचा मृतदेह अनंतने घरात आढळल्यानंतर तो खिडकीतून आत गेला होता. त्या वेळी त्याच्या शरीरावर किरकोळ जखमा झाल्या असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. गौरीला पोतदार रुग्णालयात नेल्यानंतर ती मृत असल्याचे कळताच अनंतने स्वतःला दुखापत करण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. तसेच घरातील खिडकीला बसवलेल्या जाळ्यांबाबत ज्याने काम केले त्याचाही जबाब पोलीस घेत आहेत.
या प्रकरणात अनंत गर्जेची मानसिक तपासणी केली जाणार आहे. पोलिसांनी वैज्ञानिक पद्धतीने तपास करण्यासाठी पॉलीग्राफ टेस्टची आवश्यकता असल्याचे कोर्टात सांगितले आहे. न्यायालयाने अनंत गर्जेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, घर बदलताना गौरीला सापडलेल्या कागदपत्रांमुळे त्यांच्या नात्यातील तणाव वाढत गेला आणि त्यातूनच हा गंभीर प्रकार घडला.






