प्रतिनिधी

गणेश सुळ
Pune News: केडगाव: चौफुला येथे वाहतूक कोंडी (Pune Traffic) हा गंभीर प्रश्न बनला आहे. मुख्य रस्त्यांवर व्यावसायिकांनी अवैधपणे रस्ता व्यापला असून, त्यामुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. या अतिक्रमणामुळे प्रवाशांना वाहतुकीच्या कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. काही मिनिटांच्या प्रवासासाठी प्रवाशांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
वारंवार होणाऱ्या समस्येची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिम राबविली आहे. काही ठिकाणी, विशेषतः भाजी तसेच फळ विक्रेत्यांसारख्या अनधिकृत विक्रेत्यांमुळे रस्ते अरुंद होतात आणि वाहतूक कोंडी होते.
वाहनांची दुरुस्ती करणारी गॅरेज आणि विक्रीची दुकाने तसेच अनाधिकृत टपऱ्या मुख्य रस्त्यांवर थाटल्यानेही वाहतूक कोंडी होते. पुढील काळात या सर्व अनाधिकृत व्यवसायावर बंदी घालण्यात आली आहे.
अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईने वाहतूकोंडीला तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी सुपेरोडवर असणाऱ्या अरुंद पुलामुळे हा प्रश्न अद्यापही तसाच आहे.रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग याच्याशी पत्रव्यवहार करून लवकरच कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल.अतिक्रमण हटाव मोहिम राबविल्याने वाहनचालक आणि प्रवाशी यामध्ये तात्पुरते समाधान आहे.
बाळासाहेब सोडनवर – सरपंच बोरीपार्थी






