Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आता नंबर गडकरींचा! राजीनामा झालाच पाहिजे” इथेनॉलवरून वाद पेटला; हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 26 July 2026, 18:07

मुंबई: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकारण पुन्हा तापले असून, आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही विरोधकांनी निशाणा साधला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी इथेनॉल मिश्रित इंधन धोरणावर टीका करत नितीन गडकरी यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, इथेनॉलयुक्त पेट्रोल आणि डिझेलमुळे सर्वसामान्यांच्या वाहनांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. एका बाजूला वाहनधारकांना आर्थिक फटका बसत असताना, दुसऱ्या बाजूला इथेनॉल उत्पादनाशी संबंधित कंपन्यांना मोठा आर्थिक लाभ झाल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असून, केंद्र सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सपकाळ यांनी पुढे आरोप केला की, इथेनॉल धोरणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहनधारकांची माफी मागावी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, विविध विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून पुढील भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.

 

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘तिरंगा’ रॅलीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. त्यांच्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या आरोपांवर किंवा राजीनाम्याच्या मागणीवर नितीन गडकरी किंवा केंद्र सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पहाटेच्या काळोखात अपघाताचा थरार! भरधाव कारचं नियंत्रण सुटलं, डिव्हाइडरला धडकून थेट ओढ्यात कोसळली; पुण्यातल्या २ तरुणांचा दुर्दैवी अंत

Friday, 28 August 2026, 8:51

ताम्हिणी घाटात विवाहितेचा प्रियकरानेच केला घात! नवरा तुरुंगात असतांना तिनं बॉयफ्रेंड पटवला अन् त्यानं कारमध्येच तिच्यासोबत…

Friday, 28 August 2026, 8:25

MH-12 चा जमाना संपला! पहिल्याच दिवशी व्हीआयपी नंबरसाठी पुणेकरांची तुफान गर्दी; चॉइस नंबरसाठी ११०० हून अधिक अर्ज दाखल

Friday, 28 August 2026, 8:02

१७ वर्षांपूर्वीचा कारनामा अन् फसवून लग्न! शिल्पाला छळणाऱ्या गवारे कुटुंबाचा काळा इतिहास समोर; खून, पैसा, प्रॉपर्टी अन् ब्लॅकमेल

Friday, 28 August 2026, 7:30

आज पाऊस पडणार की कडाका वाढणार! हवामान विभागाने दिला इशारा; शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, वाचा आजच्या हवामानाची ताजी अपडेट

Friday, 28 August 2026, 7:16

Daily Horoscope: रक्षाबंधनाला जुळून आलाय ‘हंस राजयोग’! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ; वाचा आजचं तुमचं राशिभविष्य

Friday, 28 August 2026, 7:05
Next Post

मोठ्या कंपनीत नोकरी करण्याचं स्वप्न पडलं महागात! मोबाईलवर 'तो' एक मेसेज आला अन् सगळंच झालं उध्वस्त...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp