नाशिक: नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे (Rupali Chakankar) राज्यातील राजकारण आणि समाजजीवन दोन्ही स्तरांवर मोठी खळबळ उडाली आहे. अनेक महिलांच्या (Ashok Kharat Case) लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या खरातचे व्हिडिओ समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली असताना, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याही भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेषतः खरातची (Rupali Chakankar Resign) पाद्यपूजा केल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. (Latest Marathi News)

या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सध्या उपस्थित होत असलेल्या सर्व प्रश्नांना पुराव्यासह उत्तर देणार असल्याचा दावा केला. “एखाद्या व्यक्तीसोबत फोटो असणे हा गुन्हा आहे का?” असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित करत, केवळ व्हायरल फोटो किंवा व्हिडिओंवरून निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे संकेत दिले.
दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन चाकणकर यांनी मुंबईत राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत सखोल चौकशीची मागणी केली आहे. यानंतर त्या पुण्याकडे रवाना झाल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. या भेटीत नाशिकमधील भोंदूगिरी प्रकरणाबाबत आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे.
यासोबतच वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि त्यानंतर चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आता त्यांचा राजीनामा जवळपास निश्चित मानला जात आहे.







