पुणे: भारतात आर्थिक व्यवहारांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले पॅन कार्ड (Pan Card New Rules) आता नव्या नियमांमुळे चर्चेत आले आहे. 1 एप्रिल 2026 पासून पॅन कार्ड बनवण्याच्या (Pan Card Online Apply) प्रक्रियेत मोठा बदल होणार असून, अर्ज करण्याची पद्धत अधिक कडक आणि पारदर्शक करण्यात येणार आहे. आतापर्यंत केवळ आधार कार्डच्या आधारे पॅनसाठी अर्ज करता येत होता, मात्र ही सुविधा 31 मार्च 2026 पर्यंतच उपलब्ध राहणार आहे. (Pan-Adhar Link)

नव्या नियमांनुसार, 2026-27 आर्थिक वर्षापासून पॅन कार्डसाठी अर्ज करताना आधारसोबतच जन्मतारखेचा अतिरिक्त पुरावा सादर करणे बंधनकारक होणार आहे. यामध्ये जन्म प्रमाणपत्र, 10 वीची मार्कशीट, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र यांसारख्या कागदपत्रांचा समावेश असू शकतो. या बदलामागचा उद्देश म्हणजे ओळख पडताळणी अधिक मजबूत करणे आणि बनावट पॅन कार्ड तयार होण्यावर आळा घालणे.
सरकारच्या मते, सध्याच्या प्रणालीमध्ये एका व्यक्तीच्या नावावर अनेक पॅन कार्ड जारी होण्याची शक्यता होती. नव्या नियमांमुळे ही त्रुटी कमी होणार असून करप्रणाली अधिक सक्षम आणि विश्वासार्ह होईल. तसेच, पॅनवरील नाव हे आधारच्या नोंदींशी पूर्णपणे जुळणे अनिवार्य करण्यात आले आहे, ज्यामुळे वेगवेगळ्या कागदपत्रांतील विसंगती टाळता येईल.
या बदलामुळे अर्ज प्रक्रिया थोडी अधिक वेळखाऊ होण्याची शक्यता असली, तरी दीर्घकालीन दृष्टीने ही पद्धत अधिक सुरक्षित ठरणार आहे. डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत सरकारकडून सेवा अधिक पारदर्शक आणि फसवणूकमुक्त करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.
दरम्यान, ज्यांनी अद्याप पॅन कार्ड काढलेले नाही, त्यांच्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत केवळ आधारच्या आधारे अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. त्यानंतर नव्या नियमांनुसारच अर्ज करावा लागणार आहे.
पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करता येते. अधिकृत संकेतस्थळावर जाऊन “New PAN – Indian Citizen (Form 49A)” निवडून आवश्यक माहिती भरावी लागते. त्यानंतर ओटीपीद्वारे पडताळणी करून शुल्क भरल्यानंतर अर्ज पूर्ण होतो. पडताळणी यशस्वी झाल्यावर पॅन कार्ड जारी केले जाते. एकूणच, या नव्या नियमांमुळे पॅन प्रणाली अधिक सुरक्षित, अचूक आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







