Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News: शिरूर हादरलं! क्रिकेट स्पर्धेवरून दोन गटात गँगवॉर; दोन्ही बाजूंनी फायरिंग; बैठकीतच पिस्तुल निघालं अन्….

योगेश मारणेby योगेश मारणे
Friday, 20 March 2026, 21:26
Shirur News: Shirur shaken! Gang war between two groups over cricket tournament; Firing from both sides; Pistol fired during the meeting and....

न्हावरे: शिरूर तालुक्यातील मांडवगण (Shirur News) फराटा येथील भैरवनाथ क्रिकेट ग्राउंडवर किरकोळ वादातून उसळलेल्या संघर्षाने थेट गोळीबाराचे रूप घेतल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेत दोघेजण जखमी झाले असून, परस्परविरोधी फिर्यादींवरून शिरूर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील आरोपींविरुद्ध (Pune Crime) गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच पार पडलेल्या मांडवगण फराटा गावातील यात्रेनिमित्त लावलेल्या बॅनर तसेच क्रिकेट स्पर्धेच्या पोस्टरवर फोटो लावण्याच्या कारणावरून सुमारे दहा ते बारा दिवसांपूर्वी दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता.हा वाद मिटवण्यासाठी गुरुवारी (ता. १९) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संबंधित दोन्ही गट भैरवनाथ क्रिकेट ग्राउंडवर एकत्र आले. मात्र, चर्चा सुरू असतानाच वातावरण तापले आणि वादाने हिंसक वळण घेतले.

अक्षय गोविंदा पाटील (वय २९ ,रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अमोल आनंदा चौगुले, राहुल सुदाम गिऱ्हे आणि संदीप तेलंग (सर्व रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी वाद घालत दमदाटी केली. यावेळी संदीप तेलंग याने पिस्तूल काढून पाटील यांच्या दिशेने रोखले. झटापटीदरम्यान गोळी सुटून ती अमोल चौगुले याच्या हाताला लागली. त्यानंतर चौगुले याने पिस्तूल हिसकावून घेत अक्षय पाटील याच्या दिशेने गोळीबार केला. यात अक्षय पाटील याच्या उजव्या बरगडीला गोळी लागून तो जखमी झाला.

तर दुसऱ्या बाजूने मिथुन उर्फ अमोल आनंदा चौघुले (वय ३१) याने दिलेल्या फिर्यादीनुसार,अक्षय पाटील व त्याच्या साथीदारांनी पिस्तुलातून जीवघेणा गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गोळीबारानंतर चौघुले व त्याचे मित्र जीव वाचवण्यासाठी पळत असताना, काही जणांनी दगडफेक व शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी सुत्रधार शिंदे, ऋतिक चव्हाण, योगेश मचाले, दिगंबर शेंडकर, मिनीनाथ गव्हाणे याच्यासह काही अनोळखी व्यक्तींविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिरूर पोलिसांनी दोन्ही फिर्यादींवरून विविध गंभीर कलमांच्या अंतर्गत तसेच आर्म अ‍ॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बेकायदेशीर पिस्तुलांचा सुळसुळाट; कायदा-सुव्यवस्थेला धोका

शिरूर तालुक्यासह ग्रामीण भागात बेकायदेशीर पिस्तुलांची वाढती उपलब्धता ही चिंतेची बाब ठरत आहे. किरकोळ कारणांवरून थेट गोळीबारासारख्या गंभीर घटना घडत असल्याचे चित्र समोर येत आहे. युवकांमध्ये वाढती आक्रमकता आणि शस्त्रांचा सहज वापर यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून बेकायदेशीर शस्त्रसाठ्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे असून, नागरिकांनीही संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post
Rupali Chakankar Resignation: Rupali Chakankar abruptly resigns as the chairperson of the State Women's Commission after the Chief Minister's order.

Rupali Chakankar Resignation: रुपाली चाकणकरांचा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.