नाशिक: नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत चक्क धर्मांतर आणि महिलांच्या छळाचे भयानक रॅकेट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कॉर्पोरेट जगात ‘धर्मांतराचा’ अजेंडा राबवला जात असल्याने नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची मुख्य सूत्रधार निदा खान गेल्या 20 दिवसांपासून फरार असून, पोलीस तिच्या मागावर आहेत.

26 वर्षीय निदा खान या कंपनीत टीम लीडर म्हणून कार्यरत होती. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या निदाने आपल्या पदाचा वापर एका विशिष्ट षड्यंत्रासाठी केला. तपासात समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे:
-
टार्गेट टीम: कंपनीत नवीन येणाऱ्या हिंदू मुलींची निवड निदा स्वतः करायची. त्यांना ट्रेनिंग देण्याच्या नावाखाली आरोपींकडे सोपवले जात असे.
-
मानसिक आणि लैंगिक छळ: कामाच्या दबावाचा वापर करून तरुणींचे मानसिक खच्चीकरण केले जाई. त्यानंतर त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त केले जात असे.
-
व्हॉट्सॲप ग्रुपचा वापर: हे संपूर्ण रॅकेट एका गुप्त व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे चालवले जात होते. यामध्ये सहा पुरुष आणि दोन महिला आरोपींचा समावेश आहे.
निदा खान ही केवळ एक कर्मचारी नसून या प्रकरणाची ‘ऑपरेशन हेड’ होती. कंपनीची एचआर अश्विनी चैनाणी हिच्या अटकेनंतर निदाचा खरा चेहरा समोर आला. आरोपींना आर्थिक रसद पुरवण्यापासून ते मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यापर्यंतची सर्व सूत्रे निदाच्या हातात होती. तपास यंत्रणांना संशय आहे की, हे केवळ स्थानिक रॅकेट नसून याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय नेटवर्कशी जोडलेले असू शकतात.
निदा खानला पकडण्यासाठी नाशिक पोलिसांची तीन पथके रवाना झाली असून, तिच्या अटकेनंतर अनेक बड्या नावांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.







