Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

व्यावसायिकाचा पाठलाग करत गाडी अडवली, काचा फोडून गळा चिरला! किरकोळ वादातून कोल्हापूर-सांगली सीमेवर रक्तरंजित थरार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 25 November 2026, 15:25

कोल्हापूर : चारचाकी गाडी आडवी मारल्याच्या रागातून कोल्हापूर-सांगली सीमेवरील कोथळी परिसरात एका व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. विकास बाबूराव बोंद्रे (वय ४५) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. ते मिरज तालुक्यातील हरिपूरच्या माजी सरपंचाचे पती होते. या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

विकास बोंद्रे हे मित्र महंमद नायकवडी यांच्यासोबत मोटारीतून कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते. काम आटोपून ते सायंकाळच्या सुमारास हरिपूरकडे परतत होते. त्यावेळी कोथळी परिसरात संशयित अभिनंदन ऊर्फ अभी राजगोंडा पाटील-धडेल (वय ३६, रा. कोथळी) याची गाडीही त्याच मार्गावर होती.

विकास बोंद्रे यांच्या चारचाकीमुळे आपल्या गाडीला अडथळा निर्माण झाल्याचा राग संशयिताला आला. त्यातून त्याने बोंद्रे यांच्या गाडीचा पाठलाग केला. रिंग रोड परिसरात त्यांची गाडी अडवून वाद घातला. हा वाद वाढल्यानंतर संशयिताने बोंद्रे यांच्या गाडीची काच फोडली. त्यानंतर जवळील धारदार हत्याराने त्यांच्या मानेवर वार करून गळा चिरल्याचा आरोप आहे. हल्ल्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाला.

या घटनेनंतर विकास बोंद्रे यांचे मित्र महंमद नायकवडी यांनी तातडीने त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. गंभीर जखमी अवस्थेतील बोंद्रे यांना सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

विकास बोंद्रे यांचा वीटभट्टी आणि प्लॉट विकासाचा व्यवसाय होता. ते हरिपूरचे ज्येष्ठ नेते संगुदादा बोंद्रे यांचे नातू होते. त्यांच्या पत्नी कविता बोंद्रे या हरिपूरच्या माजी सरपंच होत्या. त्यांचे आजोबाही हरिपूरचे सरपंच होते. या घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बोंद्रे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

दरम्यान, कोल्हापूर-सांगली सीमावर्ती भागातील गावांमध्ये अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध विक्री वाढत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. नशेखोरीतून गुन्हेगारी घटनांमध्येही वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अशा घटना रोखण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांतील पोलिसांनी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

व्यावसायिकाचा पाठलाग करत गाडी अडवली, काचा फोडून गळा चिरला! किरकोळ वादातून कोल्हापूर-सांगली सीमेवर रक्तरंजित थरार…

Wednesday, 25 November 2026, 15:25

पुण्यात नवरा-बायकोचा कारनामा! गोड बोलून जाळ्यात ओढलं अन् तिघांकडून ११ कोटी ६७ लाख उकळून पसार; नेमकं प्रकरण काय?

Wednesday, 25 November 2026, 15:08

पुणे हादरलं! भरदिवसा शिवाजीनगर कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार; जामिनावर सुटलेल्या तरुणाचे हात तोडले, कोयत्याने २० वार, पहा Video….

Wednesday, 25 November 2026, 14:42

पुण्यात बँक अधिकाऱ्यांनीच केली फसवणूक! वसुली अधिकाऱ्यांशी संगनमत करून ज्येष्ठ व्यक्तीचे १७ लाख रुपये लाटले

Wednesday, 25 November 2026, 14:31

निर्माण डेव्हलपर्स, मंगलमूर्ती वास्तूसह आठ जाहिरातदारांविरोधात गुन्हा दाखल! पुण्यात अनधिकृत जाहिरात फलक लावणे चांगलेच भोवले

Wednesday, 25 November 2026, 14:28

महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या पाटील कुटुंबासोबत घडलं भयंकर! संपूर्ण कुटुंबाला कालव्यात फेकलं; 3 जणांचा मृत्यू, 2 मुलं बेपत्ता

Wednesday, 25 November 2026, 14:02
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp